Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Ashutosh Purohit

Inspirational


2.5  

Ashutosh Purohit

Inspirational


आपलं माणूस.

आपलं माणूस.

2 mins 2.7K 2 mins 2.7K

I missed you...
 वाक्य छोटंसंच.. पण किती ताकद लागते ना म्हणायला..! त्यातून हे वाक्य जर आपल्या नात्यातल्याच व्यक्तीला म्हणायचं असेल तर आणखीनच लागते..
 किती कोशात वावरत असतो ना आपण सगळे..
 आपल्या माणसाला, "माझं तुझ्यावर प्रेम आहे "असं चुकूनही म्हणत नाही आपण...
 आणि याचं justification आपण काय देतो..?
 "ते माहितीच असतं की त्यांना... त्यात वेगळं सांगायचं काय परत ! उलट न सांगता कळणं, हेच खरं प्रेम !"
 काही अंशी हे जस्टिफिकेशन बरोबरही असतं, पण 'खरं' नक्कीच नसतं.. या कारणासाठी आपण समोरच्या आपल्याच माणसाला "I missed you" किंवा "I love you " म्हणत नाही, असं नसतं..
 कारण वेगळंच असतं आणि आपण पुढे करतो वेगळंच..!
 आपल्याला गरजंच वाटत नाही...! या वाक्यांची मोठी ताकद पेलण्याची गरजच वाटत नाही आपल्याला...!
 प्रियकर, प्रेयसीला I love you, I missed you या वाक्यांनी सतत न्हाऊ का घालतो ?
 कारण, आत कुठेतरी दोघांनाही ही भीती असतेच, की
 मी जर त्याला किंवा तिला गमावलं तर ? ही भीती वाटणं चूक नाही हा... ! एक नातं सशक्त ठेवण्यासाठी या भीतीची थोडी गरज असतेच..
 ही भीती आपल्याला आपल्या नात्यातल्या माणसाबद्दल वाटतंच नाही.. कारण आपल्याला माहिती असतं, की काहीही झालं तरी ही व्यक्ती आपल्याला सोडून वगैरे जाणं शक्यच नाही.. ती तसं करूच शकत नाही.. तिला गरज आहे आपली, वगैरे अशा काहीतरी खूप रुक्ष कॉन्सेप्ट्स घेऊन जगायला लागतो मग आपण... आणि इथे ओलावा निघून जातो.. नातं म्हणजे एक व्यवहार व्हायला लागतो, तो इथेच..!
 समोरच्याच्या मनात, आपल्या "I missed you " ची किंमत किती जास्त असते, हे आपल्याला जाणवतंच नाही.. किंवा जाणवलं तरी आपण त्याच्याकडे कानाडोळा करतो..! स्वतःत असतो आपण फक्त !
 या सगळ्यात, आपली अशी अपेक्षा असते, समोरच्या व्यक्तीने आपल्याला पूर्णपणे समजून घ्यावं..

 पण जर समोरची व्यक्ती emotional असेल तर ? तिला जर तुमचं तिच्याकडे लक्ष आहे आणि u miss her, हे ऐकण्याची भूक असेल तर ?
 तर काय ?
 तरीही कोणीच बोलत नाही ! दोघेही नाही !
 ज्याला वाटतंय तोही नाही, आणि ज्याला ऐकायचंय तोही नाही !
 वर वर सगळंच नॉर्मल असतं !

 जरी कमाल रंगतो, आयुष्याचा सारिपाट...
 खेळगडी चाले आत, एक सुनी 'वादळवाट'...!!!


Rate this content
Log in

More marathi story from Ashutosh Purohit

Similar marathi story from Inspirational