आपले स्त्रीत्व जागृत करा
आपले स्त्रीत्व जागृत करा
माझ्या भगीनींनो आज खरी गरज आहे एकतेची संघटित व्हा आणि स्व:स्त्रीत्व जागृत करा. अत्याचार सहन करून आपले अस्तीत्व धोक्यात टाकू नका.नरपिसांटाना सोडू नका.
८ मार्च महिला दिवस कसा साजरा करायचा एक नाही अनेक घाव राजरोसपणे चिघळत आहेत.त्या जखमेनिशी जगणे असह्य झाले आहे ती गोष्ट कोणत्याही स्त्रीजातीला विचारता सुस्काऱ्या शिवाय काहिच उत्तर मिळत नाही .आजच्या नवयुगातही समाजातील स्त्रीजातीची व मुलींची घोर भर्सना होती आहे शिक्षीत असूनही वस्तूपेक्षा जास्त तिची किंमत नाही. आपला हक्क काय व किती असतो ,हे स्त्रीजातीला माहित असूनही ती आपले प्राण वाचवू शकत नाही.आश्या जगण्याला काय म्हणावे.
जी स्त्रीजात अर्वाचीनकाळी राजदरबार भूषवणारी राज्यकर्ती होती तिची आज अशी दयनिय स्थिती झालेली आहे. किती खंताची बाब आहे. अजून किती सहन करणार आहोत याला काही सिमा आहेत काय,किती कॅन्डल मार्च आणि चर्चा करणार आहोत आपण.
थांबवा ही स्त्रीभ्रुण हत्या आज मुंलीची संख्या पुरूषापेक्षा कमी आहे.आताही स्त्री ही समान हक्काची स्वामिनी आहे.तिची या दुनियेत अती आवश्यकता आहे, शंभर मुंलीतून एकतरी साहसी जन्म घेईल आणि या विकृत समाजाला वठनीवर आणन्यासाठी दुर्गेचे रूप धारण करेल .नका मारू गर्भात जगूू द्या त्यांना.आणि फुलू बहरू द्या .
आजच्या वातावरणाचे बिघडलेले तारतम्य धोक्यात आलेल्या आपल्या मायबहिनीचे प्राण आपणच वाचवणार आहोत. आता आपण सक्षम व्हायला पाहिजे.जर मुलींची संख्या कमी झाली .स्त्रीभ्रुण हत्या वाढली तर अशी विषमता जर खरंच राहिली तर उद्या भीषण प्रश्न उभे राहणार नैसर्गिक गरज पुर्ण न होणे,समाजात मुली कमी होणे , वेळेवर लग्न न होणे या सर्व बाबी स्त्रीपतन होण्यास कारणीभूत होऊ शकतात,स्त्री भ्रुण हत्या प्रश्न ज्वलंत बनतो आहे .त्यापासून समाजात विकृतीने बस्थान मांडले आहे.
समाजात मुलींवर जेंव्हा अत्याचार होतो , बलात्कार होतो बदनामी च्या भितीने मुखातून वाचा फूटत नाही.सभ्य लोकांच्या जगात ह्या गोष्टी दाबल्या जातात .
अशीच एक अमानवीय घटना घडली.अजून एक निर्भया पेट्रोल टाकून जाळली.त्यात ती गंभीर जखमी होऊन मृत्युशी झूंज देत मरणयातना भोगून गेली.
हिंगनघाट वर्धेची ही बातमी खुपच दुखी करणारी होती.
तिला नागपूरला अॉरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये भरती केले ,ती मुलगी उच्च शिक्षित होती महाविद्यालयात बॉटनी या विषयात प्राध्यापिका होती. एकतर्फी प्रेम करणारा युवक विकेश नगराळे विवाहित एका अपत्याचा बाप होता.त्या नराधमाने तिचा पाठलाग करुन तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिच्यावर टेंभा फेकून आगेत जाळले.बघणार बग्गे सेल्फी ने फोटोशूट करीत होते पण तिला वाचवायला कोणिच पुढे आले नाही.अश्या
समाजाला काय म्हणायचे!
समाजात आपणही एक घटक असतो आपणही कुठेतरी आंशिक जबाबदार असतोच ना! एक नाही अनेक प्रकरण घडत आहेत आणि उजेडात दिवसाढवळ्या बलात्कार होतात आहे.एकतर्फी प्रेमातून आज बलात्कार करुन जाळण्याचे प्रकार सध्या वाढत चाललेले आहेत. अंग पुर्णत:हा झाकलेले असेल तरी वासनांध नजरेने बलात्कार करतात .बलात्काराच्या वाढत्या घटना मोठ्या चिंतेची बाब असून समाजात खालच्या स्थरावरील विकृतीला महिलावर्ग बळी पडती आहे.ही आजघडीला मोठी शोकांतिका आहे .
ह्या विद्रुप आदर्शहिन समाजाचे स्थिती हास्यस्पद होत
आहे.ही मोठी लज्जास्पद गोष्ट आहे.
इथले गचाळ राजकारण आणि कायद्याचा कित्येक
वर्षानुवर्ष चालत असलेले खटले चालवून सबूता अभावी जीवंत असूनही मरनयातना भोगाव्या लागत आहे.स्त्रीजातीला मरनासन्न वेदनेला बदनामीला सामोरे जावे लागत अाहे.हा समाज बलात्कार होणाऱ्या स्त्रीसोबत विक्षिप्तासारखा वागत असतो ही लाज्जास्पद बाब आहे. वास्तविक पाहाता कशीही स्त्री सुरक्षित नाही तिचे भविष्य अंधकारातच आहे.ती अख्ख आयुष्य कोणत्यातरी अघटित घटनेने भित भितच मरत असते.
आता हे चित्र बदललेच पाहिजे ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे माणुसकीला काळीमा लावणार्या नराधमांना,गुन्हेगारांना भरचौकात सर्वांसमोर जिवंत जाळले पाहिजे.जिवंत जळण्याचा अनुभव त्यांना आलाच पाहिजे.
महिला,मुलींनी भविष्यासाठी आता शासनानेच काळजी घेतली पाहिजे.त्यासाठी सुरक्षाकवच मजबूत करून देशाची स्थिती सांभाळली पाहिजे.आज विविध सामाजिक ,कौटुंबिक ,आर्थिक कारणामुळे अशा अपप्रवृत्ती समाजात घडत आहेत.पण आपल्या कडे आजार झाल्यावर उपाययोजना केली जाते.त्यापेक्षा आजार होण्या अगोदर किंवा होऊच नये म्हणून खबरदारी घेणं आवश्यक आहे. त्यासाठी बालवयापासुन मुलांच्या मनावर चांगले संस्कार होणे गरजेचे आहे. यासाठी फक्त मुलांवर नाही तर मुलींनाही चांगली समज ,सवयी व संस्कार देणे महत्त्वाचे आहे.कारण प्रत्येक वेळी पुरुषच चुकीचे वर्तन करतो असे म्हणणे योग्य ठरणार नाही. छोट्या बालीकेपासून तर म्हातारी वृध्द असो या वासनेच्या हव्यासाने बरबटलेले नराधम टपूनच असतात. म्हणुन स्त्रीजातीला पर्यायाने वावरतांना भितीने ग्रासले आहे.आपल्या देशात ही गुंड प्रवृती मोठ्या प्रमाणात दिसते आहे. यासाठी मानसिकतेला काहीतरी प्रतिबंध घालायला हवा आज लेकीबाळी चे जीवन धोक्यात आणि शासकीय यंत्रणा बेमालूम कुचकामी ठरत आहे.त्यापेक्षा मदतीची अपेक्षा न बाळगता त्यांना स्ट्रॉग बणवायला हवे, त्यांचे खच्चीकरण करू नये.
आपण आपल्या मुलींना काही करू शकत नाही व सारखी रोकटोक करून त्यांचे खच्चीकरण करणारे लोक ं खुप आहेत भय दाखवून मनोबल पाडणाऱ्या गोष्टीपासून त्यांना दूर ठेवा. आपण खुप काही करू शकतो अस सांगून शील जपायची जबाबदारी तिचीच आहे ही गोष्ट तिला समजाऊन सांगा. आपल्या मुलीला आज ती शाळा काॅलेज कामानिमित्त बाहेर पडते तिला समज देण्याचे काम आपणच केलं पाहिजे . स्वैराचार व स्वछंदीचा फरक लहान मुलींना नाही समजत त्यांना भरपूर स्वातंत्र द्या स्वच्छंदीपणे जगणे शिकवा. मुलींना प्रोत्साहन द्या.तीला कोंडून ठेवू नका आपल्या लाडक्या लेकीला जगण्याचा आनंद पुरेपुर घेवू द्या.
स्त्रीयांना भोग्य वस्तू न समजता त्यांना बरोबरीचा दर्जा द्या मदत करून पुढे जावू द्या. समर्थपणे स्वाभिमानाने जगण्याचे मार्ग सूचवा ,काळ बदललेला आहे. विचार करा आज प्रगत देशात अन्याय सहन करने यौग्य नाही या गोष्टी त्याना समजवून सांगा .तसेच आजच्या स्त्रीया व मुलीं पुरूषाच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून कार्य करीत आहेत स्वता:ला कोणत्याही परिस्थितीत कमी लेखू नका दिलेरीने वागायची हिम्मत द्या ."एका जीवन सुखी तर पुरिण कुटूंब सुखा" हा मंत्र लक्षात असू द्या.समाजात स्त्रीचा अपमान होता कामा नये.
वरवर बघता आठ मार्च हा दिवस महिला दिन म्हणून आपण साजरा करायचा पण संसारातील कटू अनुभव आनंद साजरा करू देत नाहीत. संसारात कुठलेही संकट येवो त्याला सामोरे जाण्याची धमक आणि कुवतही तिच्यात असते.पण ममतेचा अथाह सागर संवेदना तिच्या ह्रदयात भरलेल्या म्हणुन ती संसारात तडजोड करीत असते. हेवेदावे सांभाळते, कमीपणा घेवुन मनातल्या स्वप्नांची तिलांजली देत असते.समाजात वावरतानाही असंख्य वाईट गोष्टींचा घराणेशाहीच्या,संस्काराच्या नावाखाली तिच्या भावना दाबल्या जातात.अनेक समस्यांंना सामोरे जावे लागत असते.सहनशक्ती पलीकडचे जगणे जगत असते.आयुष्यभर घरसंसार समाज नियम जपतच असते.तरीही तिची झोळी ही रीकामी का रहावी आणि तिच्या मजबुरीचा फायदा का उचलावा.आता कोणतीच महिलां असा अपमान झेलणार नाही.
माझ्या भगिनिंनो आज खरी गरज आहे एकतेची संघटित व्हा आणि स्व:स्त्रीत्व जागृत करा. अत्याचार सहन करून आपले अस्तीत्व धोक्यात टाकू नका. नरपिसांटाना सोडू नका.हि माझी कळकळिची विनंती आहे.
सर्व स्त्रीजातीला महिला दिवसाच्या शुभेच्छा...