Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Pallavi Udhoji

Others


3  

Pallavi Udhoji

Others


आम्हा स्त्रियांची तारेवरची कसरत

आम्हा स्त्रियांची तारेवरची कसरत

3 mins 722 3 mins 722

आधीच्या काळात स्त्रीवर अनेक बंधने लादली जात. घराबाहेर पडायचं नाही, डोक्यावर पदर घ्यायचा, पुरुषांसमोर उभारायचं नाही, अशा अनेक बंधनात स्त्री बांधली गेली होती. परंतु आजच्या आधुनिक युगात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्री प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे.


आज स्त्रीची नुसती कुचंबना होत आहे. आजची स्त्री ही पुरुषांच्या बरोबरीने काम करते कारण तसंच आहे आज नोकरी करणं ही स्त्रीची गरज आहे. त्याला कारण म्हणजे आज वाढलेली महागाई, अरे आज महागाई इतकी वाढली की आज पती-पत्नीला दोघांनाही नोकरी करणे खूप गरजेचे झाले आहे. परंतु या क्षेत्रात स्त्री अजून भरडली जात आहे. स्त्रीने नोकरी करावी की नाही याचे उत्तर वेगवेगळे आहे ते आपल्या परिस्थितीवर व प्रत्येकाच्या विचारसरणीवर अवलंबून आहे. पारंपारिकरित्या पुरूषांची जी क्षेत्रे काबीज केली आहे तेथे प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री आघाडीवर आहे.ह्या स्त्रीकडे बघताच एक गाणं आवर्जून ओठावर येत

   "तुज पंख दिले देवाने कर विहार सामर्थ्याने"

  

देवाने स्त्रीला बुद्धिमत्ता दिली, सहनशीलता, त्याचबरोबर प्रेमळ हृदय पण दिलं त्याच जोरावर तिने सगळीकडे आपला ठसा उमटवला आहे. परंतु आज आपण पाहतो स्त्रीची खूप प्रशंसा होत आहे तर एकीकडे स्त्री खूप भरडल्या जात आहे. स्त्री ऑफिसमध्ये काम करते दिवसभर काम करून थकत नसेल का? ऑफिसची वेळ दहा ते सहा पण दहा वाजता जायचं तर तिला घर हे 9:30 वाजता सोडावं लागत असे. त्याआधी पहाटे पाच वाजता उठून नवऱ्याचा डबा, पोरांच्या शाळेची तयारी सगळे तिला तीन ते चार तासात करावं लागत असे. परत दिवसभराचा काम एवढ्या सगळाआटपून तिला निघावे लागेल. किती कसरत करावी लागत असेल तिचा कोणी विचार करत असेल का? आई ऑफिसला जाते म्हटल्यावर पोरांची कुचंबणा. आई आज तू नको जाऊ ना? असे म्हणणारे तिची लेकरे आईचं कस मन होत असेल बाहेर पडताना. आई आपल्याला दिवसभर दिसणार नाही या विचाराने त्यांचे चेहरे केविलवाणे होणे. केविलवाणे पोरांचे चेहरे दिवसभर तिला डोळ्यासमोर दिसेल किती त्रास होत असेल तिला. उलट दिवसभर आई बाहेर राहते. घरात सासूबाई सासरे तिच्यावर आक्षेप घेणार, काय काम असेल हिला. 'दिवसभर दोनदा चहा आणि एसीमध्ये बसत असेल.' पण हा विचार का नाही करत की हिचा बॉस हिला फुकटचा पगार देत असेल का? तिला काम तर करावाच लागत असेल ना? आज सक्ख कोणी फुकटचा पैसा देत नाही कोणी विचारत पण नाही. मग तो कंपनीचा बॉस काय फुकट पगार देणार. आज पुरुष पण बाहेर काम करतो तो थकतो पण स्त्री ही थकत नसेल का? पुरुष घरी आल्यावर सोप्यावर बसून पाय पसरवून हुकुम सोडणार आणि तिने मुकाट्याने कुरकुर न करता सगळ्या आज्ञा ऐकला पाहिजे ही पुरुषांची अपेक्षा असते.

  

स्त्रीची खूप द्विधा मनस्थिती होते. या परिस्थितीत एखाद वेळेस तिची बस चुकली तर लगेच लेट मार्कचा शिक्का बसतो त्यावर लगेच चर्चेला सुरुवात होते किंवा मुलांना बरं नाही म्हटलं आणि लवकर घरी गेल्यावर बॉस्त लेक्चर ऐकायला तयार आणि घरी जर लवकर नाही गेलो तर घरी बोलणी बसतात कशी अवस्था होत असेल स्त्रीची बघा. घरी कमी-जास्त झालं तर घरचे बोलणारे आणि ऑफिसमध्ये चूक झाली तर बॉस बोलणार किती कुचंबणा होत असेल स्त्रीची बघा. अशा वेळेस प्रत्येक स्त्री बोलेल नको हा संसार नको ही नोकरी असं वाटतं निघून जावं.

   

आज प्रत्येक स्त्रियांना या परिस्थितीशी सामना करावा लागत आहे आज मी माझ्या लेखात जे लिहिलं आहे मला कोणावरी आरोप करायचा नाही फक्त आज प्रत्येकाने हा विचार करायला हवा की स्त्री आपली कोणीतरी आहे ही कुणाची बहीण, पत्नी आहे, आई आहे तिच्याकडे फक्त मशीन म्हणून बघू नका. ती एक प्रेमळ सहनशीलतेची एक स्त्री आहे. तिला घरच्यांकडून शाबासकीची थाप हवी आहे कौतुक हव आणि प्रोत्साहन हवं. तिलाऑफिस कडून प्रेमाचे चार शब्द व मदतीची अपेक्षा आहे तिला तुम्ही प्रेमाचा मायेचा हात द्या तिला मागे खेचू नका तिचा सन्मान करा तिला मान द्या एवढेच माझे म्हणणे आहे.


Rate this content
Log in