Ujwala Rahane

Others

4.3  

Ujwala Rahane

Others

आले डोळे भरून पुन्हा

आले डोळे भरून पुन्हा

4 mins
274


प्रत्येक घरात पक्षपंधरवडा साजरा होतो. तिथीनुसार आपल्या पूर्वजांना आपण आमंत्रित करतो. यथेच्छ पाहूणचार घेऊन पूर्वज आपल्या स्वगृही परततात. त्यापैकी एक हे जोडपं. 👨‍❤️‍👨त्यांची हि कैफियत...


   येतायं का जोशीपंत ?आग मी कशाला? तूला बोलावले आहे सुनबाईंनी आज अविधवा नवमी ना? मला बोलावतील तेव्हा मी जाईन.सरूबाई तिथीनुसार सुनबाईंकडे जेवायला निघाल्या होत्या. म्हणून सहज त्यांनी जोशीपंताना प्रश्न केला. 


  हो येतो ना! घुश्श्यातच जोशीपंत बोलले. आता काय? जेव्हा खावसं वाटत होतं, तेव्हा पोटभर तर नाहीच पण थोडफार दिले तेही त्रागाकरूनच. आता मार तिथी घालतात. सगळी थेरं नूसती दिखाऊपणा नसानसात भरलायं.


अहो! जोशीपंत तुम्हांला वयोमानानुसार सोसायचे नाही. मग तुमची तब्येत बिघडायची म्हणून कमी दिले असेल हो. चांगले काय केले ते लक्षात नाही का हो तुमच्या? 


 सरू तू गेलीस नि मी एकाकी पडलो ग.! तू माञ बाजी मारलीस सवाष्ण बनून मला एकटं सोडुन गेलीस. आहो आता काय झालं ते झालं, आलात ना परत एकटं कुठे आहात आता?


  हा काढा घ्या गरम आहे,तोपर्यंतच प्या .घशाला बरं वाटेल हो ! रात्रभर खोकतायं. चालायच शरीराला सवय झाली होती आताशी. बर सगळ पथ्याचं बनवून ठेवल आहे.


  मी जाउन येते नातवंडांना डोळे भरून पाहून येते हो. माझी आठवण येत होती काहो सर्वांना?सरूबाईंनी जोशीपंताना विचारले? 


  हो तर नेहमीच!काही ना काही कारणांनी तुझं नाव कानी पडायचं बरीक. हो का! अगबाई म्हणजे माझं नशीब बलवत्तर म्हणायच आसो. 


 चालायच ती म्हण आहे ना, 'जित्तेपणी नाही स्तोम नि मसणी मारायची बोंब' नाही हो जोशीपंत गुणी आहेत हो पोरं आपली. नुसता दिखावा आसतो ग दिखावा!.


 अग शेजारच्या कुलकर्ण्यांना ठेवलं हो वृध्दाश्रमात. आहो काय सांगताय? किती छान होत सगळ त्यांच्याकडे. कसलं काय चौकोनी कुटुंबात अडचण जाणवायला लागली हो. वाहता झरा होता तोपर्यंत ठिकच होत म्हणायचं, मग झरा आटला आसो, 'जे, जे होईल ते पहावे' कुलकर्णी बिच्चारे.


  अग घोटभर चहा टाक बर. आता हे काय, मला आता निघायला हवं, बारा वाजायच्या आत पोहचायला हवं जोशीपंत. 


  तुमच आपल नेहमीचच सवय ती सुटायचीच नाही हो. देते करून, आणि ऐकतायं ना थोडा उशीर झाला तर लगेच आता उध्दार नको हं! 


  हो पण लवकर ये बरं, मला एकटं एकटं वाटत. नाहीतर बसायची गप्पा छाटत.मी इकडे एकटाच आहे लक्षात ठेवा हो! 


  येते, येते! सरस्वती बाई लगबगीने निघाल्या व वेळेवर पोंहचल्या. सुनबाईं ने अगदी जय्यत तयारी केली होतीच. मन अगदी भरून आले. पोटभर जेवण केले. सासूबाईंना हे आवडायचे, सासूबाईंना ते आवडायचे. अगदी मनभरून सांगत होती. साग्रसंगीत सगळे व्यवस्थित केले मन तृप्त झाले.


  सासुबाईंचा वरदहस्त कायम तुमच्या उभयतांवर राहिलं असा सवाष्णींनी तोंडभरून आशीर्वाद दिला. अगदी सरस्वती बाईंच्या मनातल बोलत होती. नातवंडांना डोळेभरून पाह्यलं, घरभर सगळीकडे थोडी नजर फिरवली. निटनिटके ठेवलं होत सुनबाईंनी. हं थोडा फेरफार केला होता पण चालायचेच.


  जोशीपंताचा फोटो पण हार घालून भिंतीवर लटकत होता. तो आसू भरल्या नयनाने त्या पहात होत्या,


  इतक्यात मुलगा व सुन यांचा संवाद कानावर पडला. छान झाल ना आज सगळं, आईनी निभावून नेलं खरच समाधानीच होत्या. आपापसातील संवादात दोघांनाही चांगलंच भरून आले होते. सरस्वती बाईंच्याही डोळ्यांच्या कडा पाणावल्या... 


   सुनबाईं सगळे आवरून सासूबाईंच्या फोटो, जवळ जाऊन बसली डोळे पाण्याने डबडबलेले होते.


  फोटोकडे बघत तिने विचारले आई सगळे व्यवस्थित झाले ना?मी तुम्हाला म्हणायचे, आई तुम्ही अहात तोपर्यंत मी तुमची सेवा करेल. 


  तुमच्या पाश्चात्य काही श्राद्ध, पक्ष करणार नाही बरका! तो चेष्टावारी होत हो, पण तुम्ही आमच्या नाहीत हे मन मानतच नाही. 


  काहींना काही कारणाने तुमच्या आठवणींचा सहवास बाजुला दरवळत असतोच हो! काही काही मनातल्या गोष्टी तुमच्या बरोबर शेअर कराव्याशा वाटतात तेव्हा एकटीच तुमच्या फोटोकडे बघत बसते. 


  नकळत तुम्ही माझ्याशी बोलता असा भास होतो. आजचा प्रसंग पण तसाच हो.


  अख्ख्या जगावर कोरोनाचे संकट आले आहे. त्या भितीने कोणाकडे जाणे नाही न् येणे त्यामुळे सगळ्याच गोष्टीवर बंधन आली आहेत. 


  तुमची अविधवा नवमी पहिली. मनात होतेच तुम्ही जेवायला याव्, पण कोण सवाष्ण येईल कि, नाही याची शाश्वती नव्हती. पण मिळाली हो सवाष्ण!


 असेच लक्ष असू द्या हो आमच्याकडे काही चुकले तर सांगा हो!


  सुनबाईंनी डोळ्याला पदर लावला. व फोटोला घातलेला हार निटनिटेका केला. फोटोतल्या सासूबाईं तिच्या प्रेमाने बघत होत्या.  


 अग तू गुणाची पोर, सगळे करणारच याची मला खात्री आहे ग! कशाला डोळ्यात पाणी आणतेस? सगळे चांगले होणार काही काळजी करू नकोस पोरी येते ग!


  आता तुला तर तुझ्या सासऱ्यांचा स्वभाव माहिती आहेच उगाच निमित्त नको ग! आहो आई थांबा ना, ती पुटपुटत होती.


 पण सरुताईंनी केंव्हाच परतीचा प्रवास सुरु केला. त्या पोंहचल्याच वेळेवर. जोशीपंत वाटच पहात होते. सगळ कुशलमंगल सौभाग्यवतीने त्यांना सांगितले.


  अग हो का? जोशीपंतानी पण दुजोरा दिला. बरे एकंदरीत सर्व कुशलमंगल म्हणायचं. चला येईल बोलावून तिथीनुसार जाईल मग मी ही. बघुया किती सोपस्कार पूर्ण करतील माझे? 


  भिंतीवर टांगलेल्या फोटोतील जोशीपंत घातलेल्या फुलांच्या हाराआडून गालातल्या गालात हसत होते. तिथीच्या वाटे कडे डोळे मात्र लागले होतेच. त्यांना पण नातवंडांना डोळे भरून पाह्यचे होतेच कि हो!  आपल्या स्वतःची स्तुतीपण ऐकायची होतीच कि लेकसुनांच्या तोंडातून.  


 बरका सरू मी वरून जरी फणस होतो पण, आतून गोड गोड गरेच द्यायचो ना ग.😁 😀 


 बरं, बरं झोपा आता. सरस्वतीबाईचा प्रेमळ आशीर्वाद व जोशीपंताचा वरदहस्त लाभलेल्या कुटुंबाला काय हो कमी पडणार?.. 


  जोशीपंताच्या वाक्यात आपली री सरस्वतीबाईंनी ओढली व शांतपणे दोघेही निद्रादेवीच्या कुशीत विसावली... 😢 😢 🙏


Rate this content
Log in