आकर्षण
आकर्षण
*आकर्षण विविध गोष्टींचे*
माणूस म्हटला की आकर्षण हे आलेच. हे आकर्षण विविध गोष्टींचे असते. शाळेचे,निसर्गाचे, स्वतःचे, कुटुंबाचे, परिसरात घडणाऱ्या विविध गोष्टींचे, प्राण्यांचे, पक्षांचे, खाद्यपदार्थांचे असे विविध आकर्षण असू शकते.
या आकर्षणासाठी अपसरण आवश्यक असते.
आपण एखादा उपक्रम हाती घेत आहोत अशावेळी तो उपक्रम घेऊन आपण पुढचा उपक्रमही हाती घेतला पूर्ण केला,आणि पुन्हा आपण जुन्या उपक्रमाकडे वळलो तर आपल्याला त्या उपक्रमातल्या त्रुटी स्वतःला जाणवतात आपण त्या त्रुटी भरून काढतो आणि आपला उपक्रम कसा छान होईल याची दक्षता घेतो. म्हणजेच काय तर पहिला उपक्रम कसा सरस होईल ते आपण पाहतो. आपल्या हातून नकळत राहिलेल्या गोष्टी आपण त्या दुरुस्त करतो. म्हणजेच काय तर आपण एखादी कृती केली पूर्णत्व त्याला दिलं आणि आपण पुन्हा त्याकडे नजर फिरवली तर आपल्या लक्षात आपल्या त्रुटी येतात आणि आपण त्याची अंमलबजावणी करतो.
एखाद्या कृतीचा साचा सतत तोच असेल तर तो बदलावा लागतो. एकसारखेपणा मोडून काढला पाहिजे. कोणत्याही प्रकारचा खूप छान बदल आपल्यातलाच आपल्या मनाला खूप भावतो आणि स्वस्थता मिळवून देतो आणि स्वस्थता असली की अधिक चांगल्या प्रकारे यश मिळवू शकतो चांगले विचार करू शकतो.
उदा:- शिक्षकी पेशांमध्ये पहिल्यांदा शिकवलेला एक पाठ, दुसऱ्या वेळी शिकवलेला तोच पाठ, आणि परत,परत शिकवलेला तोच पाठ आपल्या स्वतःच्या शिकवण्यातील बदल आपल्या स्वतःला जाणवतात. प्रथमतः आपण तो पाठ वाचतो. पॅराग्राफानुसार शिकवतो. गोष्टी रूप शिकवण्याचा प्रयत्न करतो. पहिल्यांदा आपल्याला पुस्तकाची गरज लागते. पण तोच पाठ सातत्याने आपण घेत गेलो तर आपल्याला बिना पुस्तक तिसऱ्या,चौथ्या वेळेला आपण मुलांना उत्तम शिकवू शकतो. म्हणजेच काय तर सराव महत्त्वाचा आहे. सराव नंतर कृती महत्त्वाची आहे. कोणतेही कार्य सिद्धीस नेण्यासाठी 'प्रयत्नांती परमेश्वर 'असेच म्हणावे लागते.
निसर्गाच्या सानिध्यात लोकं नेहमीच रमतात. निसर्गाचे लेणं पाहण्यासाठी मानवाला खूप ओढ असते. विशेषतः पावसाळ्यातील सहलींना उधाण येते. पावसाळ्यात निसर्ग हिरवा गार झालेला असतो. नदी,नाले दुथडी भरून वाहत असतात. डोंगर हिरवे गार झालेले असतात. उंचावरील धबधबे छान दिसतात त्यामध्ये मनसोक्त भिजण्याचा आनंद मुले,तरुण,वृद्ध घेत असतात. वळणावळणाचे घाटातील दृश्य पाहण्यासाठी मन हेलकावे घेत असते. आणि जे काही आपल्याला कामाचं टेन्शन असते ते आपण इथे पूर्णपणे विसरतो. हे दृश्य पाहिल्यानंतर किमान पुढील पंधरा दिवस आपण त्यामध्ये मग्न असतो. त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात आपण रमलो तर पुढचे जे काही आपले कार्य आहेत ते कार्य आपल्या हातून अतिशय उत्तम होतात. कारण आपले मन प्रसन्न असते. यासाठी दोन आठवड्याने किंवा महिनाभरानं आपण छोट्या छोट्या ट्रिप काढाव्यात. मन शांत होते. विचार बाजूला जातात. विशेष म्हणजे कुटुंबासाठी आपण वेळ देतो. आणि यातून चांगले तेच उगवले जाते. हल्ली नोकरी मध्ये अनेक टेन्शन्स असतात. त्यातून हा विरंगुळा असतो. हे स्वतःचे अनुभव असल्याने मी आपल्याला शेअर करत आहे. कोणतेही आकर्षण अधिक सुखद बनवण्यासाठी प्रतिभाशील विचार आवश्यक असतात ते निसर्ग आपल्याला अनेक रूपात पुरवतो. आपले विचार बदलत जातात. पुढील कार्यासाठी उत्साह मिळतो.
अगदी खाद्यपदार्थांचे म्हटलं तरी असेच आहे. एखादी गृहिणी एखादा खाद्यपदार्थ पहिल्यांदा बनवत असेल तर तो तिच्याकडून उत्तम होईलच असे नाही. पण दुसऱ्या वेळेला तिसऱ्या वेळेला तिने तो पदार्थ बनवला तर त्याच्यामध्ये अजून तिची सुधारणा होत जाते आणि उत्तम क्वालिटी खाद्यपदार्थाची आपल्याला मिळते. मग आपण तिला अन्नपूर्णा हे नाव देतो. तिच्या हाताची चव छान आहे असे आपण म्हणतो. एकंदरीत काय तर सराव अतिशय महत्त्वाचा आहे. कोणतेही काम सरावाने सरसच होते.
अगदी वर्गात जाणाऱ्या पहिलीच्या मुलाचीही हीच अवस्था असते. मुल वर्गात येते त्याला ओळीत बसण्याचे माहित नसते. आपला डबा, बाटली कशी ठेवावी हे कळत नसते. वहीवर,पाटीवर कसे लिहावे हे कळत नसते. परंतु रोज सूचना ऐकून, ऐकून,ऐकून तो ओळीमध्ये नीट बसतो स्वतःचे दप्तर नीट ठेवतो. डबा,बाटली जागेवर ठेवतो. म्हणजेच काय तर ऐकणं ही क्रिया त्याची होते आणि दररोज सराव होतो.
उदा:- सहा वर्षाचा एक विद्यार्थी. दुरेघी वही आहे. पेन्सिल छान टोक करून आईने दिलेली आहे. वहीचा पहिलाच अनुभव आहे. पेन्सिल हातात पकडता येत नाही. उभ्या रेषा, आडव्या रेषा सुरुवात इथून होते. मग अक्षर दिले जाते. वर्गातला एखादा मुलगा त्या एका पानावर पूर्ण एकच अक्षर लिहितो मोठ्या अक्षरात. मग इथे शिक्षकांची खरी कसोटी लागते. त्याचे लिखाण सुधारण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. त्याला हाताला धरून शिकवावे लागते. खूप गोड बोलून त्याच्याकडून लिहून घ्यावे लागते. आणि मग दोन महिन्यानंतर ज्यावेळेला तो दुरेघी मध्ये छान लिहितो तेव्हा त्या शिक्षकाला आणि त्याच्या कुटुंबीयांना जो आनंद होतो तो अवर्णनीय आहे. माझ्याच वर्गातला पहिलीचा सोहम नावाचा मुलगा या प्रकारे घडलेला आहे.
अशी बरीच काही उदाहरणे आपल्या जीवनात घडलेली असतात. एकूण काय तर सातत्य,सराव त्याची अंमलबजावणी कोणत्याही गोष्टीसाठी खूप महत्त्वाची आहे.
सामाजिक कार्यामध्ये तुम्हाला काय हवं आहे याच्या ऐवजी आपण लोकांना काय देऊ शकतो हे फार महत्त्वाचे आहे.
परस्परांशी पटवून घेण्यासाठी एकमेकांच्या विचारांच्या देवाण-घेवाणीचा विचार करावा लागतो.
ज्यावेळी आपण एकमेकांशी छान वागाल त्या वेळी 1+1 = 11 होतील. प्रश्न बरोबर किंवा चूक याचा अजिबात नसतो तर प्रश्न असतो आपला एकमेकांशी परस्परांशी पटण्याचा. वैचारिक देवाण-घेवाणीचा. आपल्या वैचारिक योग्यतेचा. लोकांच्या क्षमतेबद्दल आपला कुठेच वाद नसतो. परंतु जर आपण वर्तुळाकार ठोकळ्यामध्ये चौकोनी ठोकळा बसवला तर बसू शकेल का हो? नाही बसणार. या ठिकाणी आपल्याला वर्तुळाच्या ठोकळ्यावर वर्तुळ ठोकळाच लागणार. त्याप्रमाणे मानवाचे देखील आहे. सारख्या विचारांची लोक एकत्र आले की प्रगती ही होणारच.
वसुधा वैभव नाईक
धनकवडी,जिल्हा -पुणे
मो. नं. 9823582116
