आजच्या पिढीची मानसिकता
आजच्या पिढीची मानसिकता
अन्वी कॉलेजमधून घरी आली खूप खुश होती. आज कॉलेजचा शेवटचा दिवस होता. निरोप समारंभ होता कॉलेजमध्ये. एकीकडे तिचे मन उदास होते. कारण कॉलेजमध्ये तिचे मित्र-मैत्रिणी हे तिला कधीही भेटणार नव्हते आणि खुश होती की शिक्षण होताच तिचे नितीशशी लग्न होणार म्हणून. ठरल्याप्रमाणे बोलण्याची तारीख पक्की झाली. सकाळपासून प्रसन्न वातावरण होते दुपारी तीन वाजता नितीशच्या घरचे लोक बोलणी करण्यासाठी आले. सगळे ठरले परंतु, त्याच्या आई-वडिलांनी हुंडा मागितला. झालं सगळे अचानक स्तब्ध झाले कारण अन्वीच्या घरची परिस्थिती चांगली नव्हती. फक्त एकच संपत्ती होती, ती म्हणजे त्यांच्या मनाची संपत्ती. ते कुटुंब खूप चांगले होते एवढेच. अन्वीच्या वडिलांनी नितीशच्या वडिलांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण व्यर्थ. अन्वी तणावात गेली, तिच्या मनावर खूप परिणाम झाला. दुसऱ्या दिवशी अन्वी खोलीत पंख्याला लटकलेली दिसली, अन्वीने आत्महत्या केली.
समाजात घडणाऱ्या या घटनांना आजची तरुण पिढी बळी पडत आहे. ही घटना हुंडाबळीची असो वा बलात्काराची समाजात स्त्रियांवर होणारे अत्याचार व तिच्यावर होणारे बलात्कार यामध्ये वाढते प्रमाण दिसून येत आहे. त्यातल्या त्यात मीडीयावाले हे अत्याचार अगदी चवीने चघळत आहे. ज्या घटना घडत आहे त्यातील आरोपींना नुसते आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून या समस्या सुटणार नाही तर समाजातील प्रत्येक शिक्षित सुजाण व्यक्तीने या गोष्टीवर शांतपणे विचार करायला हवा. समाजात स्त्रियांना जरी असुरक्षिततेची भावना वाटायला लागली तरी समाजात घडणाऱ्या या गोष्टीकडे थोड्या वेगळ्या नजरेने पाहणे आवश्यक आहे.
मला असं म्हणायचं नाही की सगळ्या गुन्ह्यासाठी फक्त पुरूषच जबाबदार आहेत. याचे एक उदाहरण देते रस्त्याने एखादी स्त्री जात असेल तर मागुन बायको येणारा पुरूष त्याच्या गळ्यातले दागिने हिसकावून पळून जातो. दुसरे उदाहरण आहे की पुरुष एका स्त्रीवर बलात्कार करतो. या दोन्हीही गुन्ह्यांमध्ये आरोपी फक्त पुरुषच या दोन्ही घटना एकाच तराजूत तोलता येणार नाही. स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराला जेवढा पुरुष जबाबदार असतो तेवढाच स्त्रियांचा सुद्धा सहभाग असतो. हे तेवढेच खरे आहे. कायद्याच्या भाषेत सांगायचे झाल्यास गुन्हा करणारा व गुन्हा सहन करणारा हे दोन्ही जबाबदार असतात.
हा लेख लिहिताना कानावर एक सुन्न करणारी घटना पडली. हैदराबादमध्ये एका निरागस, निष्पाप मुलीवर काही बेखड, बेधुंद नराधम अत्याचार करतात. एवढ्यावरच ते नराधम थांबत नाही तर तिला ते जाळून टाकतात. असे अत्याचार का होतात? आपल्या भारतात आज पेहरावावरून पश्च्यात्य संस्कृती रूढ झाली आहे. माझ म्हणणं हे आहे की तुम्ही पाश्चात्य संस्कृतीचे पालन करत
ा पण आज पाश्चात्य संस्कृतीत जर कोणी अत्याचार केला तर त्याला on the spot शिक्षा दिली जाते तीच संस्कृती आपल्या भारतात कायद्याने केली तर आज प्रियंका, निर्भया अशा केसेस पुन्हा होणार नाही. आपल्या भारतात असे अत्याचार होत राहणार. गुन्हेगाराला शिक्षा होईल काही वर्षांनी तो गुन्हेगार सुटेल व हे अत्याचार खून होत राहील, काय म्हणावी ही मानसिकता?
दिवसेंदिवस समाजात जे अत्याचार वाढत आहेत ते या आदर्शवादी संस्कृतीला प्रगल्भतेला एक काळपट डाग आहे. या एकविसाव्या शतकात भारतीय संस्कृतीवर एक भयानक घाला घातला जातो. तसे बघता आजही काही ठिकाणी प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे हुंडा पद्धतीचा अवलंब समाजात होत आहे. हुंडा पद्धतीवर कायद्याने जरी आळा घातला गेला तरी त्याकडे दुर्लक्ष करून आज या एकविसाव्या शतकात राजरोसपणे हुंडा घेतला जातो व दिला जातो हे सत्य नाकारता येणार नाही.
समाजात असेही चित्र दिसत आहे की बऱ्याच या मुली या आपल्या वडिलांना हुंडा द्यावा लागेल ते कर्जबाजारी होतील या भीतीने लग्नाआधीच आत्महत्या करत आहे. या भयाण सत्याचा दूषित परिणाम समाजावर होत आहे. याचा हुंडाबळीच्या परिणाम म्हणजे समाजात आत्महत्या स्त्रीभ्रूणहत्या आणि मुलींचा खून अशा घटना घडत आहेत त्यामुळे स्वाभाविकच अराजकता वाढीस लागली आहे.
आज भारतात पुरुषप्रधान संस्कृतीमुळे समाजात राहणाऱ्या लोकांची मानसिकता ही स्त्रीविषयक गृहीत धरली जात आहे याचा परिणाम काय होतो या हुंडा पद्धतीमुळे मुलीचा जन्म समाज टाळत आहे.
आपला समाज पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरेत पूर्णपणे जखडला आहे. त्यामुळेच कायदे करून सुद्धा कायद्याला न जुमानता राजरोसपणे हुंडा पद्धतीचा अवलंब करत आहे. माझ्या मते ब्रिटिशांचे राज्य होते तेव्हा त्या काळात भारताने ब्रिटिशांना हुंडा म्हणून काही ठेवी देऊ केल्या म्हणूनच त्यावेळेपासून ही हुंडा पद्धती सुरू झाली असावी.
माझा म्हणणं हे की अशा नराधमांना जे महिलांवर अत्याचार करतात त्यांना चौकात जाऊन त्यांच्यावर बंदी आणावी म्हणजे प्रियंकासारख्या केसेस भारतात घडणार नाही. अशा केस घडत आहे त्यावर आळा आणायला हवा.
निर्भया प्रकरणापासून सुरू झालेल्या गुन्ह्यात अनेकदा असे अत्याचार घडत आहे पण आपल्या भारत देशात मेणबत्या जळण्याखेरीज आपण काय केले आहे? निर्भयाच्या त्या नराधमांना अजूनही फाशी झाली नाही मला वाटतं या नराधमांना फाशीची शिक्षा देतात भरचौकात त्यांचे लचके तोडून त्यांना प्रियंकासारखं जाळायला हवं तरच समाजात कायद्याची भीती या नराधमांत निर्माण होईल माझ्या मते कायद्यात सुधारणा करून या गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा व्हायला हवी, त्यांना शासन व्हायला हवं.