The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

krishnakant khare

Others

4.5  

krishnakant khare

Others

आजच्या काळापुढील प्रश्न

आजच्या काळापुढील प्रश्न

6 mins
1.5K


काळ या शब्दाला अनेक अर्थ आलेला आहे. त्या शब्दाच्या जोडीला दुसरा शब्द आला की अर्थ वेगळा होतो उदाहरण द्यायचं झालं तर “त्याचा काळ आला होता, पण ती वेळ आली नव्हती ” म्हणजेच शब्दाशी अर्थ मरण आलं होतं पण त्याची मरणाची वेळच आली नव्हती

आता आपण काळ शब्दाचा काय चांगला उपयोग होतो ते पाहू आता हा काळ शब्द एका सकारात्मक शब्दाशी जोडला तर वेगळा अर्थ निघतो उदाहरण द्यायचं झालं तर आता आपण काळाचं शब्दाशी असा उपयोग केला तर तो पुढील प्रमाणे: - काळा पुढील प्रश्न म्हणजेच आपण काळ हा शब्द वर्तमान काळासाठी भूत म्हणजेच व्याकरणातला काळ शब्दाचा अर्थ निघतो आता 

काळा पुढील प्रश्न म्हणजेच चालू स्थितीतील घटनांवर काय परिस्थिती निर्माण होते आणि त्याचं त्यावर काय उपाययोजना असू शकेल म्हणून आपण काळा पुढील प्रश्न असा काळाचा वाक्यात उपयोग करतो आजच्या धकाधकीच्या जीवनात बरच काही प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात, म्हणजेच या चालू घडीला दैनंदिनी जीवनात जे काही प्रश्न उद्भवतात त्यालाच आपण काळा पुढील प्रश्न असं वापरतो,म्हणजेच या स्पर्धेच्या युगात दगदगीचा युगात कोणचा कोणाला तालमेल राहालेला नाही त्यामुळे आता काळा पुढील प्रश्न जे उद्भवतात त्याचा शास्त्रीय अभ्यास करून त्यावर उपाययोजना करणं हीच काळाची गरज आहे कारण आपण फार पूर्वीपासून आत्तापर्यंत प्रत्येक धाकदुघीच्या प्रसंगातून बाहेर निघताना आपल्याला फारच तारेवरची कसरत करावी लागली, म्हणूनच आपल्याला काळा पुढील प्रश्न हा पडतो.

वाढती लोकसंख्या 

जे सत्ताधारी आहेत त्यांचा मनमानी कारभार त्यामुळे सामान्य जनता कुठल्या न कुठल्या संकटात येत आहे.        

          शेजारच्या राष्ट्राशी असमतोलपणा त्यामुळे कधी अणूयुद्ध होईल याची गॅरेंटी नाही. आपण जेव्हा ब्रिटिश सरकारच्या गुलामगिरीत होतो त्यावेळी भारतातील प्रत्येक धर्मातील पंथ, जात हे भेदभाव विसरून आपल्या व्यक्तिगत स्वातंत्र्यासाठी आपण सर्व एकत्र येऊन भारत स्वातंत्र्यासाठी  ब्रिटिशांच्यां विरोधात राष्ट्रीय लढा दिला त्यावेळी राष्ट्रीय एकात्मता ही काळाची गरज होती पण आता स्वतंत्र झाला तरीही ज्या,ज्यावेळी भारतावर राष्ट्रीय संकट आले त्या,त्यावेळी आपण भारतीय हिंदू-मुस्लीम सिख ईसाई व इतर भारतातील सर्वधर्मीय एकत्र येऊन आपल्या भारत देशासाठी शत्रूवर तुटून पडलो अशा या आपल्या राष्ट्रीय एकात्मता मुळे आपण अचानक येणाऱ्या अशा निसर्गातल्या आपत्तीवर, सामाजिक संकटावर, परराष्ट्रीय संकटे अशा कितीतरी आपत्तीवर आपण तोंड देऊ शकतो. यातूनच आपल्याला आपल्या भारतीयांना राष्ट्रीय एकात्मता ही काळाची गरज आहे हे सहजच लक्षात येते म्हणून आजच्या पिढीला या काळाची गरज म्हणून राष्ट्रीय एकात्मता ची नितांत आवश्यकता आहे.अशामुळे काळापुढील प्रश्न कमी होणार हे निश्चित 

काही वर्षापासून आपण जम्मू-काश्मीरमधील अस्थिर जीवनशैली पाहतो एक काळ असा होता की आपण सगळे जम्मू-काश्मीरला भारताचे स्वर्ग म्हणून जम्मू-काश्मीरला पाहत होतो पण भारतातल्या जम्मू-काश्मीरच्या राज्याला शेजारचे राष्ट्र पाकिस्तान आपल्या देशात दहशतवाद वाढीचे कडवट डोस पाजू इच्छितो आणि आपल्यापासून व आपल्या भारतापासून भारताचा अंग असलेल्या जम्मू-काश्मीरला वेगळं पाडण्याचं स्वप्न पाहतो आहे अशा या 

परकिय देशाने वेगळाच दबाव टाकून आपला देश बांधवावर दहशतवाद निर्माण करण्याचा चंगच बांधला आहे, तर काही जणांनी राजकारणाचा फायदा घेऊन आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी आपल्याच धर्माधर्मात मतभेदाचे जातीभेदाचे बीज रोपणाचे दुष्ट काम केले आहे. पण आपण सर्व भारतीयानी बारीक-सारीक गोष्टींकडे लक्ष देऊन आत्मनिरीक्षण केले तर आपल्याला आपल्या भारतातल्या सर्वांना हेच दिसेल आपण सर्व एक असताना बाहेरून कोणीतरी आपल्याला आपसात भिडवण्याचा प्रयत्न करत आहेत आपण वेळीच सावध राहून यावर उपायोजना केलेली बरी, एकसंघ भारत देश आपल्याला स्वाभिमान होता पण आता भारत देशाला विघातक करण्याच्या या नकारात्मक विचारांवर गुरफटलेले आपण सर्व राज्या-राज्यातील सीमेच्या हद्द साठी आपण एक दुसऱ्याला खाऊ की गिळू अशा वृत्तीचे झालो आहोत पण आपण यावेळी एकसंघ भारत देश या दूरदृष्टीचा विचार का नाही करत ह्याचं आश्चर्य वाटायला लागतं कारण ज्यावेळी आपण एकसंघ भारत देशाचा विचार करू त्यावेळी सर्व भारतीय हा सीमावाद भांडणाचा विषय न घेता सामोपचाराने सोडवता आल़ं पाहिजे, आपल्या आपल्यातीलच न मार्ग मिळतील असे विचार सरणी याचं आपण बिमोड करायला हवं हे कळेल आणि मग आपला भारत देश एकसंघभारत देश त्याचा आपल्याला स्वाभिमान राहील ही मुख्यत: राष्ट्रीय एकात्मता आजच्या काळाची गरज आहे..

एक आपण असेही निरीक्षण केलं तर असं आढळेल , भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर ही भारतातील नागरिकांचे शिक्षण पूर्ण झाले तरीही नोकरीसाठी नागरिकाला वणवण करावं लागलं त्यामुळे ही पुर्ण बेकारी वाढलेली आहे त्याचा असं झालेला आहे नोकऱ्या कमी बेकारी जास्त त्यामुळे निराश झालेले तरुण मग परदेशात नोकरीसाठी जातात काही तरुण गुन्हेगारी कामात अडकतात आणि देशाच्या सर हद्दीच्या दहशतवादी संघटनेत पैशाच्या लालसेने उदरनिर्वाहाच्या आशेने सामील होतात पण हेच सरकारने दहशतवादी विषारी संघटणेच्या सापाला वेळीच ठेचले पाहिजे कळलं पाहिजे त्यामुळे येणाऱ्या काळात भारतदेशाला कितीतरी अशा संकटाशी सामना करावा लागणार नाही.

आपल्या भारतातील बेरोजगार हुशार पदवीधर नोकरी नसल्यामुळे परदेशात आपल्या नोकरीची गरज शोधतात नोकरी मिळवतात आणि तिथेच कायम राहायला जातात या तिथल्या सर्व सुख-सोयीनी गरजा भागल्या जातात त्यामुळे आपला भारतातील नागरिक काही दिवसांनी परदेश मधला नागरिक होऊन जातो हीच एक मोठी दुर्दैवी घटना आहे , आपल्या राजकर्त्यानी, सत्ताधाऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपणच आपल्या पायावर दगड मारून घेतोय आणि येणाऱ्या भविष्यात आपण सर्व अपंग सारखे राहणार आहोत यासाठी सरकारने अश्या बेरोजगार बेकार तरुणांचा अशा मनुष्यबळाचा आपल्या प्रत्येक गोष्टींमध्ये उपयोग करून घ्यायला हवा आणि त्यांना त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवायला हवा. अशा बेरोजगार तरुणांचा त्यांना बेकारी भत्ता देऊन त्यांच्याकडून सरकार खात्यातून असे काही देशसेवेची कामं मिळतील  त्यांच्याकडून करून घ्यायला हवेत त्यामुळेच आपल्या बेकारी बंधू-भगिनींना आपल्या देशाबद्दल चिंता राहील व आपल्या देशाचं चांगलं व्हावं मनोमनी चिंतन कर करतील म्हणून आपल्या भारत देशाच्या आजच्या काळा पुढील प्रश्न हा बेकारीचाआहे. म्हणून सत्ताधाऱ्यांनी अशा बेकारी साठी काही उपाययोजना केल्या पाहिजेत तरच बेकारीचा प्रश्न येणाऱ्या काळापुढे कमी होईल.

जोपर्यंत पण सुशिक्षित नाहीत तोपर्यंत आपली प्रगती होत नाही त्यासाठी भारतातील प्रत्येक नागरिकांनी सुशिक्षित झालं पाहिजे तरच आपल्याला देशाच्या प्रगतीसाठी काय करायला पाहिजे याचे आकलन होईल आणि आपण प्रगतीसाठी प्रयत्न करत राहू आपला भारत देश हा पूर्वीपासून कृषिप्रधान देश म्हणून आहे त्यासाठी आपल्याला शेतकी आणि इतर काही उद्योग  त्यापासून भारतात गरजा भागतात अशा उद्योगांचं विकास झाला पाहिजे आणि शेतकी क्षेत्रात सुद्धा विकास झालं पाहिजे यासाठी प्रत्येक जण साक्षर असलं पाहिजे म्हणजेच आपल्याला आपल्या ज्ञानाचा आपल्या आपल्या क्षेत्राशी उपयोग होईल आणि मग आपल्या समाजाची उन्नती होऊ शकेल आणि भारताला समृद्ध करता येईल 

भारत देश हा जगातील मोठ्या लोकशाहीचा विशाल देश आहे म्हणून साक्षरानाच लोकशाहीचा अर्थ कळल्यावर मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क व त्याचे महत्त्व किती आहे याचा अंदाज येणार त्यामुळे सुशिक्षित, समर्थशील भारताचे अस्मिता जपणारा उमेदवार निवडून दिल्यानंतर भारत देश समृद्ध व्हायला कितीसा वेळ लागणार आहे त्यासाठी आपला भारत देशाच्या आजच्या काळा पुढे साक्षर देश झालं पाहिजे हाच काळापुढे प्रश्न आहे. 

वाढती लोकसंख्या हीसुद्धा भारत देशाच्या काळापुढे प्रश्न आहे . देशाला वाढती लोकसंख्या हे येणाऱ्या काळात दारिद्र्याचा लक्षण घेऊन येऊ शकतं असं म्हणतात, कारण वाढती लोकसंख्याच्या तुलनेत कमी लोकसंख्या च्या गर्जा कमी पडतात म्हणून वाढती लोकसंख्यामुळे सर्व गोष्टी हाता बाहेरच्या होहून बसतात आणि मग सगळीकडे असमतोल पणा होऊन जातो आणि जनजीवन व्यवस्था विस्कळीत होऊन जाईल सगळीकडे गुन्हेगारी, भ्रष्टाचार, व्यसनीपणा वाढेल आणि भारतदेशाची प्रगती खुंटेल त्यासाठी सारे साक्षर असल्याने सामाजिक प्रबोधन झालं तर समाज परिवर्तन या गणिताने इत्यादी गोष्टी झाल्या पाहिजेत. म्हणजेच "हम दो हमारे दो "याची संकल्पना जनामनात आली पाहिजे आशा लहान कुटुंबातून त्या कुटुंबाला सुखापासून कोणी वंचित ठेवू शकणार नाही अशा लहान कुटुंबाचं महत्व काय असतं याचं जनमाणसात प्रसार व्हायला पाहिजे तरच आपल्या भारतदेशाच्या आजच्या काळापुढे पडलेला प्रश्न तुम्हाला भेडसावणारा लोकसंख्यावाढीचा प्रश्न सहजपणे दूर राहू शकतो.

आजच्याकाळा पुढील प्रश्न "युद्ध" हा हि आहे,अशा या युद्धामुळे फार पूर्वीपासून जगाला ठिकठिकाणी फार मोठं नुकसान भोगावं लागलं आहे त्यामुळे फारच मनुष्यहानी झाली आहे, या युद्धामुळे मानवाचा निसर्गाशी असलेला समतोलपणा खुंटलेला आहे आपण पूर्वीपासून तर आतापर्यंत हेच पाहिलेला आहे सत्तेचा लोभे साठी देशा देशात युद्ध झालेले आहेत , युद्ध झाल्यामुळे सगळ्यांचाच प्रचंड नुकसान भोगावे लागले, त्यामुळे कोणालाच त्यापासून उपाय मिळाले नाहीत. यासाठी ही धर्मयुद्धे थांबली पाहिजेत सगळ्या धर्मात सर्वधर्मसमभावाचा प्रेरणा असते तीच प्रेरणा सगळ्या धर्मात जनमाणसात रुजवली गेली पाहिजे "विश्वबंधुता" ही गोष्ट विश्वात रुजवली पाहिजे आपण असं पाहिलं आहे प्रत्येक देशात मानवधर्म पाळला जातो त्या मानवधर्माची प्रत्येक धर्मानी प्रत्येक देशांनी बारकाईने लक्ष देऊन त्यात भावनिक प्रेमाचा वाढ केली पाहिजे प्रत्येक देशातील देशाच्या एकोपा साधणाऱ्या वीराना जागतिक स्तरावर त्यांचं कौतुक करून त्यांचं सन्मान केला पाहिजे त्यामुळेच असे एकोपा साधणारे मानवधर्म पाळणारे आपला आपलेपणा साधणारे साधक जागतिक एकतेला सार्थकी होतील आणि सहानुभूतीची साथ देणारे जागतिक वीरांना सन्मान केला पाहिजे त्यामुळेच आजच्या काळा पुढील प्रश्न "युद्ध" हे टाळले जातील हे काळापुढे पडणारे इत्यादी प्रश्न सज्ञान द्वारे ,तज्ज्ञांद्वारे हाताळले गेले तर भारताला आजच्याकाळा पुढील प्रश्न भारतालाच काय ,देशाला, जगाला काळा पुढील प्रश्न राहणार नाही आणि सगळीकडे जग हे मंगलमय होऊन जाईल!


Rate this content
Log in