Sangieta Devkar

Others

4.5  

Sangieta Devkar

Others

आजची दुर्गा.

आजची दुर्गा.

3 mins
417


सोसायटी च्या बागेत सगळ्या जेष्ठ महिला गप्पा मारत बसल्या होत्या. उद्या पासून पितृ पक्ष सुरुवात होत आहे तर कोण काय काय करत ? कोणाला दान देतात? नैवेद्य कोण कोण ठेवते या वर संभाषण सुरू होते. माधवी नवीनच त्या सोसायटी मध्ये राहायला आली होती. दोन च महिने झाले होते. सीमा ताई नी विचारले माधवी तू ठेवतेस की नाही नैवेद्य वैगेरे. कारण तू खूपच मॉडर्न राहतेस वागतेस या वयात ही. नाही मी काही ही करत नाही. उपास हे पितृ पक्ष मी काही ही पाळत नाही. का ग माधवी का सचिन करतो का सगळं मग? रमा म्हणाली. नाही मुलाला पण मी जबरस्ती काही करायला सांगत नाही. म्हणजे तू मुलगा आणि मुलगी तुझी इतके मॉडर्न विचाराचे आहात की काहीच व्रत वैकलय पाळत नाही. हो,कसे आहे ना आयुष्यात सगळं चांगले घडले असेल तुम्ही सुखी समाधानी जगला असाल तर या गोष्टी करायला हरकत नाहीत पण जिथे आयुष्यात दुःखच दुःख मिळाले असेल तर या रीती आणि परंपरा पाळण्यात पण काहीच अर्थ नसतो. इतकेच नाही तर मी माझ्या नवऱ्याचे तो गेल्या वर एकच वर्ष श्राध्द केले त्या नंतर मी त्याचे श्राद्ध ही केले नाही आणि कधी नैवेद्य ही दाखवला नाही. माधवी म्हणाली.

काय सांगतेस खरे का हे? विमल ने विचारले. माधवी सांगू लागली हो माझे लग्न झाले नवरा ही चांगला मिळाला नोकरी करत होता. आम्हाला सचिन आणि अंकिता दोन मुलं झाली. सगळं छान सुरु होत. अचानक नवऱ्याला मित्रांच्या संगतीने दारू चे व्यसन लागले आणि ते वाढतच गेले. मग सगळ्या संसाराची वाट लागत गेली. खूप दारू पिऊन यायचा नवरा मग भांडण वाद व्हायचे. कधी कधी तो माज्यावर हात ही उगारायचा. मूल लहान होती त्याला घाबरून गप बसायची. हा कामावर जायचा कधी सुट्टी टाकायचा खूप पिणं वाढले होते . एक दिवस तर त्याने मला ही जबरस्तीने दारू पाजली. नाही म्हणाले तर खूप मारहाण केली. मग त्याच्या मनात आले की मला दारू पाजायचा.सतत शिवीगाळ आणि मारहाण करायचा. मग एक दिवस त्याला कामा वरून काढून टाकले. घर चालवायला मी मग पार्लर चा कोर्स केला आणि एका पार्लर मध्ये मदतनीस म्हणून काम करू लागले. नवरा आता दारू साठी माझ्या कडे पैसे मागत होता. पैसे नाही दिले तरी मारहाण ठरलेलीच!. मग एक दिवस दारूने त्याचा घात केला. आणि गेला तो. तेव्हा मुलगा आठवी आणि मुलगी दहावी ला होती. मी पार्लर मधये काम करून घर चालवत होते. तो दिवस अजून ही मला आठवतो. नवऱ्याचा दहावा होता. सगळे नातेवाईक जमले होते. पूजा वैगरे झाली. तेव्हा माझी मुलगी अंकिता सगळ्या नातेवाईकांना म्हणाली, उद्या पासून कोणी ही आई च्या सांत्वना ला यायचे नाही. वडीलांचे जे काही होते ते सगळं आज संपले आहे. तेव्हा कोणी ही आमच्या कडे सहानभूती दाखवायला यायचे नाही. तेव्हा नातेवाईकांनी अंकिताला मला खूप नावे ठेवली आणि निघून गेली. अंकिता मला म्हणाली, आई ज्या नवऱ्याने जिवंतपणी तुला फक्त त्रास च दिला दुःख दिले त्याच्या बद्दल तुला ही काही वाटायला नको. मी माझ्या डोळ्यानी तुझा त्रास पाहिला आहे. तू खूप सहन केलेस मार खाल्लास आता बस त्या माणसाच्या नावा ने कुठलाच धार्मिक विधी करायचा नाही. सगळं बंद त्याचा फोटो ही कुठे दिसता कामा नये. अंकिता च्या अंगात तेव्हा जणू देवीच संचारली होती. मला ही तिचे म्हणणे पटत होते. त्या नन्तर पाहिले वर्ष श्राध्द केले मग परत नवऱ्याच्या नावाने काही ही मी केले नाही. अंकिता आणि सचिन चे लग्न झाले. ते त्याच्या घरी सुखी आहेत. मी मला हवे तसे मना सारखे राहते जगते. आयुष्य आनंदात जगते.देवा वर आहे विश्वास पण जास्त कर्म कांडात पडत नाही. जे मनाला आवडते पटते ते करते. लोकांचा विचार नाही करत. माधवी चे बोलणे कोणाला पटले तर कोणाला नाही. पण लोकांचा विचार किती करायचा हे माधवी ला चांगले माहीत होते. 

समाप्त....


Rate this content
Log in