आजचे मंत्री
आजचे मंत्री
उठाव!, ऊठा,निवडणूक आली, जोडे उचलण्याची वेळ आली. लाज शरम खुंटीवर टांगून ठेवाव्यात. चला कार्यकर्ते सतरंज्या, जोडे उचलूयात. या सगळ्या निवडणुकीत घराणेशाही फार प्रमाणात पुढे जात आहे. मंत्राचे मुले मंत्री होत आहेत. आणि बाकी कार्यकर्ते लालचीसाठी त्यांचे जोडे, सतरंज्या उचलण्यात येत आहे.
मंत्री कोटीच्या कोटी रुपये आपले घरी नेत आहेत. गोरगरीब जनतेचा कोणीच विचार करत नाही. हे सगळे मंत्री, पुढारी एका माळेचे मणी आहेत. जनतेपुढे मी मारतो, तू रडल्यासारखे कर. असे जनतेची फसवणूक करतात. कोणत्याही भृष्टाचारात यांचेच नाव पुढे असते. कारखाने त्यांचे, उद्योग धंदे त्यांचे, गिरण्या त्यांच्या, कोणतेही मिला त्यांच्या आहेत. ही एवढया प्राॅपर्ट्या त्यांच्या कुठून आल्या.
भ्रष्टाचारामार्गे त्यांच्या घरात आल्या. एकेकाळी जेवायला महाग असलेले हे लोक आज ऐश्वर्या आरामाची जींदगी जगत आहेत. एवढे ऐश्वर्य कुठले ,ही सर्व लुटलेले, वामन मार्गाने कमावलेली कमाई. जनतेची दिशाभूल करुन देशाची लूट केलेले हे मंत्री, सतत त्यांचेच घराण्याचे मंत्री, पुढारी होतात. त्यांच्या मागे ईडी लावा, आणखी काही लावा. ते कशालाही घाबरत नाहीत. साधी जनतेनी पाण्याची मागणी केली तर ते मंत्री म्हणतात," पाणीच नाही तर मी का xxx करु." अशी मंत्री ची भाषा आहे.
अशा मंत्रीला सत्तेचा माज आला आहे. जनता पाणी मागते, तर मंत्री काय शब्द वापरतात पहा. जनावरं राजाच्या लायकीचे लोक आज मंत्री झाले आहेत. यांना जनतेची काळजी तर नाहीच. फक्त त्यांना पैसे कसे कमवावे, ते कोणत्याही मार्गाने असो, फक्त पैसा. एवढेच. आणि कार्यकर्ते त्यांचे जोडे, सतरंज्या उचलून हैराण. असे आपल्या देशाचे मंत्री आहेत..........
