krishnakant khare

Others

5.0  

krishnakant khare

Others

आईच्या छायेत

आईच्या छायेत

6 mins
1.1K


नोन स्टाप नोव्हबंर


स्टोरी मिरर कथा स्पर्धा

 

आईच्या छायेत


डॉ.कृष्णकांत रामचंद्र खरे

सुनंदा रामचंद्र खरे निवास, पातलीपाडा, पोस्ट:-सँडोजबाग,

घोडबंदर रोड,

ठाणे,मुंबई-400607.

संपर्क क्रमांक :- 9221296346/

9029396346.


आईच्या छायेत


आई आणि गाई हिंदू धर्मात दोघांची थोरवी महान आहे आपण म्हणतो गाईंमध्ये तेहतीस कोटी देवी-देवतांचे वास्तव्य असतं म्हणून मी तर म्हणेन जिथे आईने आपल्या बाळाला जन्म दिला इथेच ती आई त्या बाळाचे तेहतीस कोटी देवी-देवता पेक्षा महान देवताआहे कारण देव-देवता आपण कोणी पाहिलय? ह्यासाठी मी कोणाशी अर्गुमेंट करणार नाही आणि मी प्रश्नही करणार नाही कारण देव-देवता यासाठीच असतील आईची,मातेची थोरवी कळावी म्हणून उत्पन्न झाले असावेत त्यामध्ये आपल्या आईची किंमत, महत्व, थोरवी जगाला कळावी. 

आपण कोण्या व्यक्तीने काही कोणाला जमत नसेल असं काही मोठं समाजहिताचे काम केले असेल तर आपण त्याला देवा सारखं मोठं काम केलं असं आपण म्हणतो कारण देवच मानवाला जमणार नाही असं काम करू शकतो असा आपण विश्वास ठेवतो आणि मानवाने असं काम केलं कि त्याला आपण मोठे समजतो पण असे कित्येक मोठंमोठे साधुसंत, थोर व्यक्ती या आपल्या या देशात भारत देशात होऊन गेले आहेत ज्या आपल्या कर्माने मोठ्या झाल्या त्या थोर व्यक्तीं आपल्याआईच्या छत्रछायेत असल्यामुळे. या थोर व्यक्तीने समाज हितासाठी असे महान कार्य केले आणि इतिहासात त्याचं नाव राहिल 

आज आपण शिवछत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा देवच मानतो, दैवत मानतो कारण त्यांची कर्तव्य ,हि कर्तव्ये कोणी साधारण माणूस करू शकणार नाही

 कारण या थोर व्यक्ती आईच्या छत्रछायेत राहून पुढे इतिहासात महान कार्य केले.

आई ,माता हि मानवाची ममतेची नैसर्गिक , भावनिक देवता आहे. आपण या जगात वावरताना आपल्याला असं आढळेल आई कितीही गरीब असो,आई कितीही श्रीमंत असो पण ज्यावेळी आई

मुलांना जन्म देते संगोपन करते तिच्या संगोपनात कोणतीच कमतरता राहत नाही ती संतान अपंग असो चांगली आरोग्यवान असो ती त्या मुलांवर निर्मल मनाने खाऊपिऊ घालते, मोठ होईपर्यंत चांगलं संगोपन करते , जगातले संस्कार काय असतात आपण कसं वागलं पाहिजे याची जाणीव करून देते.

ह्याच आईशी मुले मोठे झाल्यावर आईशी नीट वागायला तयार होत नाहीत पोरं वयाने मोठे झाल्याने पोरं आईलाच ज्ञान पाजलत असतात मग मुलांना आपल्या आईच्या छायेपेक्षा बायकोच्या छायेत राह्यायला वाटते,आईचे काळीजच तुटुन जातं बायकोचं ऐकून बोलू लागला तर,

कधीकधी हि मजल व्रुद्धाश्रमात ठेवण्याची धमकी होते पण करारी आई मुलांचे हे असं दुखद व्यवहार झेलण्यापेक्षा व्रुद्धाश्रमात जाण्यास तयार होते.ईथेच मुले चुकी करतात अरे याचवेळी आईच्या अंतरंगातलं मन ओळखायला शिकलं पाहिजे आई आपली आपल्याजवळच असायला हवी, आईची छत्रछाया आपल्याला हवीच याचा उलगडा होतो.

आपल्याला आठवत जेंव्हा आपण साधं कोलेजने दहाबारा दिवसासाठी सहलीला, ट्रिपला जातो त्यावेळेस सहलीला जाऊन सात आठ दिवस झाले नसतील आईवडिलांना लगेज काळजी वाटायला लागते. वाटतं आपलं बाळ घरी वेळवर आलं तर आपण सारं काही मिळवलं पण तेच बाळ स्वावलंबी झाल्यावर आईबापाला व्रुद्धाश्रमात ठेवायची गोष्ट केल्यावर आईबापाला किती मानसिक यातना होतात,आश्रमात आईबापाला असं वाटतं आपली मुले परत आपल्याला घरी न्यायला येतील तर बर होईल,आईबापाला याचं ध्यास लागला असतो.कधीकधी तर मुले आईबापाला बघायला येतच नाहीत  आणि आईबाप दुखाने वाटबघुन व्रुद्धाश्रमात प्राण सोडतात. काही वेळा आईच्याछायेत राहुन सुद्धा मुले मोठेपणी ईतक्या निष्ठुरपणे वागतात.म्हणून तर आईच्या छायेत असताना आई म्हणते स्वता आईबाप झाल्याशिवाय आईबापाची किंमत कळणार नाही.पाहिलत आईचं सान्निध्य ,आईची छाया किती महत्त्वाची असते ती.


लेखकाने, कवीने आई या शब्दाला कविता करताना, लेखन करताना तिच्या अस्तित्वाची ओळख करून दिलेली असते म्हणून तर उगाचच नाही का लेखकाला, कवीला देवदूत म्हंटले असते याकरताच अर्थात आईच्या छायेत म्हणजेच मायेची ममता आई हिचे त्या मुलांवर तसे संस्कार झाले असते. हेच तर असते आईचे सान्निध्य


मी लहान असताना शाळेत नेहमी शाळेच्या भिंतीवर सुभाषिते वाचायचं त्या सुभाषित मध्ये लिहिले होते आणि त्याची मला उकल होत नव्हती ते सुभाषित पुढील प्रमाणे होते “स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी!” माझं नंतर नंतर वाचन वाढत गेलं तेव्हा त्या सुभाषितांचा उकल मला झाला आईची माया तुलना न करण्यासारखे असते , तुम्ही कितीही संपत्तीवान व्हा तुम्ही कितीही मोठे अधिकारी व्हा, तुम्ही कितीही मोठे विद्वान व्हा या सर्वांसमोर आईची लीलाच् मोठी असते. कोणी ही कितीही कशानेपण मोठा झाला तरी आईसमोर नगण्यच असतो कारण अशा संतानाला,मुलाला कोणी जन्म दिला असते तर ते आईनेच जन्म दिले असते म्हणून आईची सावली ,आईचे अस्तित्व हे त्या मुलासाठी फार मोठे असते हेच जेव्हा छत्रछाया संपते तेव्हा त्या मुलाला तो कितीही मोठा असला तरी त्याला आपण आई विना भिकारीच आहोत असे वाटत असते म्हणून तर कवी यशवंतजी दिनकर पेंढारकर यांनी आईच महत्व किती असतं हे त्यांनी “स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी ” ही त्यांची कविता गाऊन समजावून सांगितले आहे.

मातेच्या छायेतल्या अर्थात आईचे सान्निध्यात बाळाचा पहिला गुरु कोण असेल तर ती त्याची माताच असते, बाळाची बोलीभाषा चांगले व्यवस्थित ठेवायची असेल तर मातेने चांगले व्यवस्थित त्या बाळाबरोबर बोलणं चालणं चांगलं ठेवलं पाहिजे तरच ते बाळ मोठेपणी चांगलं बोलायला लागतं असं संमोहन तज्ञांचे मत आहे म्हणजेच आपल्याला असंच दिसून येईल कि बाळाच्या छत्रछायेत  आई हिच बाळाची पहिली गुरू असते.       

         जगातल्या कोणत्याच मुलाला आपल्या  आईबद्दल कुणी बरं-वाईट बोललेलं आवडत नाही कारण मुलाचे जन्म आईकडून झालेलं असतं, मुलाचे संस्कार ,संगोपन, आईच्या छायेत झालेले असतात, 

हिंदुस्थानाला हिंदवी स्वराज्याची अस्मिता लाभली त्यामागचं उत्तम उदाहरण म्हणजे शिव छत्रपती शिवाजी महाराजांची आई मां साहेब जिजाऊ माता .

 मासाहेब जिजाऊ मातांच्या छत्रछायेत राहून महाराष्ट्राचे स्वराज्य संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची घडी उभारली होती,आणि जगातल्या इतिहासात शिवछत्रपती शिवाजी महाराज  आजराअमर झाले.

आईच आपल्या मुलाला मोठ्यांबरोबर नम्रपणे वागायला,बोलायला शिकवते, एक दुसऱ्यांबद्दल आदर करायला शिकवते एक दुसऱ्यांना मदत करायला शिकवते ,घरातलं काम आपल्या आपणच करायला पाहिजे म्हणजे परावलंबी न होता आपलं काम आपल्यालाच करायला यायला पाहिजे म्हणजे आपण कोणावर अवलंबून राहू शकत नाही . हे मी आईच्या छत्रछायेतले संस्कार बरोबर पाळत होतो पण एके दिवशी शाळेतून मी घरी आलो होतो

 आई मला रागाने भांडायला लागली बोलत होती “तू तू सरांची कॉलर पकडली” आईचं म्हणणं होतं सर म्हणजेच गुरू, आपल्याला चांगली विद्याप्राप्ती साठी सरांचा ,गुरुजींचा आदर मान ठेवायलाच पाहिजे आणि चांगल्या विद्यार्थ्यांना असं वागणं शोभत नाही, सरांची कॉलर पकडायला नको होती", 

"हेच मुलाला आई बापाने संस्कार दिलेत का?" "असंच जग बोलायला लागेल तर काय करायचं ?,तर यामुळं आईबापाला आणखीन वाईट गोष्ट कोणती असु शकते. ,” हे ऐकून माझ्या पायाखालची वाळू घसरली, मी समजावण्याचा प्रयत्न करीत होतो पण आई काही ऐकत नव्हती मग माझ्या वर्गातल्या मित्राने आईला समजावून सांगितले" कृष्णकांतवर सरांनी मारायला छडी उगारली होती पण कृष्णकांतने ती छडी मारू दिली नाही कारण सर जे खोडकर मुलगा समजत होते ती खोडी दुसऱ्याच मुलांनी केली होती आणि सर गैरसमज करुन कृष्णकांतला छडीने मारणार होते पण कृष्णकांतने खोडी केली नव्हती म्हणून सरांची छडी खायाला तो तयार नव्हता त्याने ती छडी अडवली बस एवढेच कारण होतं," "कृष्णकांतनी, सरांची कॉलर पकडली , कृष्णकांतनी, सरांची कॉलर पकडली" हे पुर्ण हायस्कूल मध्ये झालं होतं आणि हि बातमी घरी कशी कळली देवाला माहिती, पण मी बेशिस्त वागलो म्हणून शिक्षा, ह्या गैरसमजाने आईने घरच्या छडीने माझी वाट लावली असती पण मित्राने शाळेतला खरा काय प्रकार घडला सांगितल्याने माझा मार वाचला होता.

" मी काही वाईट गोष्टी केल्या तर आई मला मारू शकते याची जाणीव मला होती. म्हणून मी सगळ्यांबरोबर आदबीने वागत होतो, पण उगाचच मी कुणाचा मार खाणार नाही हे मी आईला सांगितल्यावर आई म्हणाली "त्यासाठी अरेतूरे करुन नाही चालनार ,आपली बाजू खरी असेल तर आपल्याला प्रेमाने पण समजावता येते हे तू कधी विसरु नकोस"आईच्या ह्या समजवण्यात जीवणतला चांगल्या गोष्ठीचा अर्थबोध होत होता. आईच्याछायेत असताना मुलाला किती तरी संसाराच्या चांगल्या अर्थ घेण्यार्या गोष्टी सांगत असते, आणि हेच आईने आपल्या मुल्याच्या तनामनावर गिरवल्यावर भविष्यात मुलाचेच भविष्य उज्वल होते,म्हणून प्रत्येक मुलांना आईच्या छायेची किंमत ठेवावीच लागेल, आई असल्यावर किंवा नसल्यावर आपल्याला कसं वाटतं ह्याची जाण ठेवायलाच हवी ,आईबद्दल बारीक निरिक्षण केलेत तर आई मोठी दैवत आहे असं वाटायला लागेल आणि एक गोष्ठ खरी आहे जर का आपल्याला खरं देव बघायचं असेल तर आईबापाशिवाय ह्या जगात असे दुसरे देव शोधुन सापणार नाही.जो पर्यंत त्यांची आपल्यावर छाया असते तो पर्यंत आपण निर्धास्त असतो,आणि त्यांची छाया नसली तर आपण किती पोरके झालो ह्याची कल्पना येते.मग आपल्याला कळून चुकतं आईच्या सान्निध्याशिवाय,आईच्या छायेशिवाय 

" स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी" 



Rate this content
Log in