Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Shobha Wagle

Others


5.0  

Shobha Wagle

Others


आईच्या छायेत

आईच्या छायेत

3 mins 714 3 mins 714

"लेक लाडकी ह्या घरची

होणार सून मी त्या घरची "


लाऊड स्पीकरवर हे गाणे लावले होते. घरात सगळे पाहुणे जमले होते. सगळा गोंधळ चालला होता कारण उद्या माझ्या लग्नाकरता ही सगळी गडबड चालली होती.

आजची शेवटची माझी रात्र ह्या घरात. उद्या मी दुसरीकडे जाणार ह्या विचारांनीच मन हळवे झाले होते. एका लग्नाने माझ्या जीवनात एवढा बदल!! मी तीच पण माझं नाव, गाव, सगळ्यात परिवर्तन होणार??

एवढी वर्ष आईच्या छायेत राहिले आणि आई मला आता दुसऱ्याला देणार? अशा विचाराने मी कासावीस झाले. ह्या घरातल्या एक एक आठवणी माझ्या डोळ्यासमोर सरकू लागल्या.

किती लाडाने वाढवले मला! बाबा गेले तरी आईने काही कमी पडू दिले नाही. मला उच्च शिक्षण दिले. बाबांची उणीव मला आईने कधीच जाणवू दिली नाही. ती सतत माझ्या पाठी मागे खंबीरपणे उभी राहिली. एकदा लहानपणी सर्वांबरोबर खेळताना आम्हा मित्र मैत्रिणींचे भाडंण झाले. ते एवढे विकोपाला गेले की अक्षरशः मारामारी झाली. सगळ्यांच्या आया पण त्यात सामील झाल्या. पण माझी आई गच्चीवरून नुसती पाहत होती. तिचे लक्ष माझ्याकडे होते. भाडंण माझ्यामुळे झाले नव्हतेच. पण खेळाच्या भाडंणात दोन गट होतातच ना, तसे झाले. मी सुरूवातिला शाब्दिक चर्चेत भाग घेतलला. जेव्हा हमरी तुमरीवरून मारामारी सुरू झाली तेव्हा मी घाबरले. एका दोघांचा मार खाल्ला पण त्यांना उलट मारायला गेले नाही. थोड्या वेळाने मी वर घरी आले. आईने विचारले, "आज जेवणार नाहीस ना तू? मार खाऊन आली आहेस ना, म्हणून विचारते? कसली गं भांडणं करता एवढी मारा मारी पर्यंत? आणि उगीच मार खाऊन बावळटा सारखे काय राहायचे! मला नाही आवडले. भांडण करायचेच नाही आणि कुणाचा फुकट मारही खायचा नाही. बावळट मुळीच राहायचं नाही." आईच्या ह्या उत्तराने मी समजून चुकले आणि कधी भांडण व्हायला आलं की मी थांबवायचा प्रयत्न केला आणि वेळ पडलीच तर उगीच मार न खाता दोन चार द्यायला ही मागे राहिले नाही. आम्हा मुलांचा खेळातला हिशेब खेळातच चुकता करून यायची. आयांना मध्ये पडायची गरजच भासत नव्हती. मुले खेळतात, भांडतात आणि लगेच एक होतात हे असं चालतच असतं हे नंतर कळले. 

 

 आपली माऊलीच आपल्या मागे असल्याने एक सकारात्मक उर्जा प्रत्येक मुलामध्ये येतच असते. आपल्या माणसांची, बाहेरच्या जगाची, कुणाचीच पर्वा वाटत नाही जेव्हा मी आईच्या छायेत असते. अडी अडचणीत, शाळेत, कॉलेजात मी कधीच मागे राहिले नाही. माझ्या आईच्या प्रोत्साहनाच्या शब्दांनी "बाळा निडर हो, कुणाला घाबरायचे कारण नाही. सत्कर्म करत रहा, कुणालाही दुखवू नकोस, सौजन्याचे गुण अंगी बाळग" असे बरेच संदेश आई मला पावलो पावली देत जायची. आईचा भक्कम पाठिंबा असल्याने मी ही बिनधास्त पुढे पुढेच गेले आणि आज एक नामवंत डॉक्टर म्हणून नाव लौकिकाला आले ते सर्वस्वी आईमुळेच.


आता मात्र मनात हुरहुर आणि काळजी वाटते. आता माझ्या आईच्या छायेपासून मी दूर जाणार. आपली संस्कृती सांगते मुलीने नवऱ्याच्या घरी नांदायला जायचे. आणि आईने आता एकटं राहायचं? मनाला पटत नाही. आपली परंपरा बदलायला हवी. आईच्या छायेत मी वाढले, मोठी झाले आणि आई आता म्हातारी होतेय मग मीच तिला आधार द्यायला हवा आणि मी तो नक्की देणार . आईच्या छायेत मलाही राहायला मिळणार. शेखर, माझा होणारा नवरा, ह्याच्याशी बोलून मी आईला माझ्या जवळच ठेवणार हे नक्की.

अशा गोड विचारानेच मी माझ्या लग्नाचा विचार करत झोपी गेले.Rate this content
Log in