आईचा आशिर्वाद
आईचा आशिर्वाद
समिधा आज परदेशात जाणार होती तिचं मास्टर्स पूर्ण करण्यासाठी.. शहरात जरी लहानाची मोठी झाली असली तरीदेखील अतिशय सालस, समंजस व साधी राहणी पसंद करायची ही समिधा. आईने तिच्यासाठी एक वर्षाचं खाद्यपदार्थ बांधून ठेवले होते. लोणच्या पापडपासून ते चिवडा, रव्याचे, बेसनाचे लाडू, चकली, थालीपीठ, बाकरवडी, बर्फी, कांदा लसूण तिखट, शेंगदाण्याची चटणी अगदी सगळंच आईने 2 बॅगेत तिच्यासाठी भरून ठेवलं होतं.
आई समिधाजवळ आली आणि म्हणाली की बाळा सगळे आयटम आहेत का ते एकदा पाहतेस का? तशी ती म्हणाली अगं आई मगापासून तू ही बॅग 10 दा चेक केलीयस ना, आई म्हणाली हो ग पण तरी मला काहीतरी राहिल्यासारखं वाटतंय, समिधा म्हणली हो ना बरोबर राहिलंय... खूप महत्वाची गोष्ट राहिलीय..आईने कासावीस होऊन विचारलं अगं सांग ना पटकन.. समिधा म्हणाली, ज्या गोष्टीमुळे आज मी एवढी शिकू शकलेय, ज्या गोष्टीसमोर कशाचीच तुलना होऊ शकणार नाही ती गोष्ट म्हणजेच तुझा आशिर्वाद..
