आई
आई


आ-आत्मा...
ई-ईश्वर...
ईश्वराचा आत्मा जिथे निवास करतो ती आई.
नऊ महिने उदरात वाढवते ती आई.
अनेक यातनातून मूल जन्माला घालते ती आई.
लहानपणात जपते ती आई.
सुसंस्कार लावते ती आई.
स्वतः कष्ट करून मुलांना सुखी करते ती आई.
जेवणापासून शाळेत जाईपर्यंत सारे शिकवते ती आई.
आजारपणात उशाशी बसून काळजी घेते ती आई.
चुकल्यावर हातात छडी घेवून शिस्त लावते ती आई.
काय आणि किती आठवणी हो आईच्या ...
आई हृदयातले मखर त्या मखरात तिचे अढळ स्थान ते कोणीही हिरावू शकत नाही.
मुलगा काय किंवा मुलगी काय यांच्या संस्काराचा उत्तम पाया ही माऊलीच तर आहे.
सुखदुःखात साथ देणारी माय आपण कितीही मोठे होऊ दे,पण घरी आल्यावर डोक्यावरून तिचा फिरणारा हात,तो स्पर्श काय कसा गेला आजचा दिवस?हा तिचा प्रश्न...क्षणात दिवसभराचा शिण घालवतो.
आपले लग्न होते. मुली संसारात रमतात.मुलांची जबाबदारी वाढते. माऊलीला जरा आता एकट वाटायला लागत. मुलीच्या पाठी संसारात तिला काही अडचणी आल्या तर खंबीरपणे उभी राहते. मुलाच्या संसारात रममाण होते. पण आलेली सूनबाई जर लेकीप्रमाणेच वागली तर प्रश्नच येत नाहीत.आणि सासू झालेल्या आईनेही आपले विचार जरा बदलावेत. मग त्या आईच्या मुलाचा,मुलीचा संसार सुखाचा होईल.
आई ही आईच असते. तिची सर कुणालाच नसते. सर्वांच्या सुखातच ती सुखी असते. लाडात वाढलेली ती पण एक कन्या तर असते...
आई हा विषय खूप मोठा आहे. मी साधारणच लिहिलेय. एवढे एक वाक्य लिहिते आणि संपवते..."लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते."
सर्व ताईंना समर्पित...