STORYMIRROR

Anjali Bhalshankar

Others

3  

Anjali Bhalshankar

Others

आई.वात्सल्य ममतेचे ऊगम स्थान

आई.वात्सल्य ममतेचे ऊगम स्थान

3 mins
227

मातृत्व म्हणजे ममता आणि वात्सल्य.जन्मभर फक्त आणि फकत माया प्रेम ममतेचे दातृत्व पार पाडणारं व्यक्तीमत्व म्हणजे माता.जी आई अम्मी, माॅम, माँ ,अशा विविध रूपात आपण पहातो. पंरतु आई होण्याची चाहुलीने तिचा वात्सल्याचा झरा ऊगम पावतो .तो पूढे आपल्या लेकरांना झालेल्या त्यांच्या नवजात बालका पर्यंत कायम सतत वहात असतो. पहिल्यांदा आई होण्याची चाहुलीने निसर्गानेच दिलेल वात्सल्याच देण पुरेस असत ममतेचा झरा ऊगम पावायला. ज्याचे पुढे मुलांना वाढताना,कुटुंबाचा वटवृक्ष मोठा होता होता मायेच्या सागरात रूपांतर होत असा सागर जो कधीही आटणार नाही. जन्मदात्री आजच्या प्रेमात अशी ताकद असते जिला कोणिही आव्हान देऊ शकत नाही. देव असेल तर तो सुद्धा नाही .कारण तीने जन्माला घातलेल मुल जरी जन्मानंतर आपल वेगळ शरीर, वेगळ व्यक्तिमत्व व ओळख घेऊन आलेल आसेल पंरतु, अगोदरची नऊ महीने ते मातेच्या रक्तावर पोसलेलं असत तीने खाल्लेला खास, पिलेल पाणी, इतकच काय घेतलेला श्वासाचासुदधा अर्धा वाटा त्या लेकराला योग्य प्रमाणात कसा मिळेल याची ती पुरेशी काळजी घेत रहातेच, पंरतु पुढेही वेळप्रसंगी स्वःता उपाशी राहून मुलांच पोट भरेल याची काळजी घेते.इवलासा नाजुक जीव!!! दुग्धपान करताना मातेच वात्सल्य ओंसडून वहात असत होय! स्वर्गीय यालाच म्हणत असतील अशा भावनेने परमोच्च आनंद तिला परिपूर्ण स्त्री असण्याची देत असते आपण जननी आहोत ही गोष्ट तिला जगातिल सर्वात सुखी स्त्री असण्याचे असे प्रशस्ती पत्र देते ज्यापुढे कोणतेही गौरव पत्र फिकेच असेल .आई होणं हा सर्वात मोठा सोहळा.बाळाला हसताना रडताना शांत झोपेत असताना पाहुन निरनिराळ्या विचार व भावनांनी आईचे मन भरून येते.त्याच काही दुखत असेल, बाळ जेवत नसेल रात्रभर रडत अथवा जागत असेल, अशा वेळेस आईच्या मनाला होणार्या वेदना केवळ तीच जाणते.जन्मभर आई फक्त देतच रहाते.हळूहळू मुल मोठी होत जातात शाळा कॉलेजात जाऊ लागतात. तरीही आईची काळजी मात्र तशीच असते, अगदी लहानपणी मुल जरा जरी नजरे आड झाले तर झालेली जीवाची काहीली तगमग जशी होती तशीच. घरी येण्याच्या वेळेला जरा ऊशिर झाला तर कासावीस होऊन जाते ती .तुम्ही कीतीही मोठे झालात तरीही आईच्या नजरेत लहानच असता. आयुष्यात कधी कधी खुप अवघड कठीण परिस्थिती येते .अपयशाला तोंड द्यावे लागते .सारे मार्ग बंद होतात. तेव्हा आईची कुस समर्थपणे आपल्याला साथ देते. क्वचित प्रसंगी कान धरून तर कधी मार देऊन आपल्या खोडखर नादान वृत्तीला,ती पायबंद घालते चुकांना .आई स्वतःलाही तितकीच शिक्षा करून घेत असते. कारण तीच्या लेकरावर कुणी प्रश्न ऊठवावा बोट दाखवावे हे तिला मान्य नसते. तिच्या रागावणयातही ममताच दडलेली.........आईच वात्सल्य जेव्हडे तिने सुटीच्या दिवशी घरात कष्टाने वेळात वेळ काढून बनविलेल्या पिज्जात दिसत ना!!! तितकच वा त्याहून अधिक दूर देशी नोकरी, शिक्षण यानिमित्त रहात असलेल्या लेकरासाठी अडाणी, खेड्यात रहाणारया, मातेन' कुण्या एकाद्या लाल परीच्या चालक वाहकाला विनंति करून फाटक्या कापडात बांधुन दिलेल्या भाकरीच्या चवडी मधूनही तीच ममता प्रेम त्याग पाहून भरून दाटून येत.......बापाचा राग आपलया अगोदर झेलणारी, कुणी वाइट बोललं तर तीव्र रागाने संतापणारी, हट्ट पुरे करणारी, वा पुरा करून देण्यासाठी, वडिलांपर्यंत पोहोचवणारी मध्यस्तीही आईच!! अर्थात तीची ममताच असते ना !मनुष्य कीतीही संपत्ती कमावेल बँक बॅलन्स गाड्या नोकरचाकर भोवताली असतील तुमच्या शब्द झेलायला तत्पर असतील. मान सन्मान देतील. तुमची सेवा करतील तुम्ही जगातील महागडी मोटार,ऊंची वस्त्र परीधान कराल, परंतु त्या स्पर्शात मातेचे वात्सल्य नसेल. ऊंची वस्त्रात आईच्या मायेच्या पदराची ऊब नसेल. संपत्ती मध्ये आईने कित्येक दवस डाळ तांदळाच्या डब्यात वा, फडताळात दडवून ठेवलेल्या त्या चुरगळलेल्या नोटेचा गंध नसेल............म्हणूनच कोणीतरी म्हणलेय ना स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी. हे कीती वास्तव सत्य आहे याची जाणिव प्रकर्षाने होतेय. खरेच आई तुझी माया ममता वात्सल्याची भुक जन्म भर वाढतच जाते आई तुझी खुप आठवण येते.........


Rate this content
Log in