Ujwala Rahane

Others

4  

Ujwala Rahane

Others

आई सहन ही होत नाही ग

आई सहन ही होत नाही ग

4 mins
299


आई सहन होत नाही आणि सांगता पण येत नाही ग!


  अग काय झाले? बाळा बरे नाही का येऊ का घ्यायला? एक महिन्यापूर्वीच लग्न झालेल्या आर्या आणि गिरीजा म्हणजे आईचा आणि मुलीचा फोनवर संवाद.


  नको आई सांगेन मी.इतक्यात सासुबाईंच्या आवाजाने आर्याने फोन ठेवला. कोणाशी बोलत होतीस आर्या आईशी?वेळीच सावध करते दोन, दोन मिनिटाला आईला फोन करायचा नाही. नसता फोन पण मिळणार नाही. पैसे मोजलेत आम्ही समजलं तुझ्यासाठी. सासूबाईंचा तोंडाचा पट्टा चालू झाला.


   आर्या कावरीबावरी झाली.महिना पण उलटला नव्हता लग्नाला तर सासरचे नवनवीन रंग आर्याला उमगायला लागले.संभावित चेहऱ्यामागचे फसवे चेहरे समोर येऊ लागले.जो जिवनसाथी लग्नाच्या आधी स्वप्नांचे इमले बांधत होता. तो आता घराची वाटच विसरत होता.


  स्त्रीप्रधान संस्कृती सासरा गुपचूप लोडाला टेकून तंबाखू चोळत होता.दीर रात्री अपरात्री घरात तर्र होऊन परतत होता.नणंद पर्स आडकवून मनाला येईल तेंव्हा बाहेर जात होती आणि येत होती. नवरा तर पहिल्या रात्रीच मद्यात बुडून नशेत बराच बरळला होता.तेंव्हाच अर्थ सत्य आर्याला समजले.आणि आर्यातील आर्याच संपली. 

   सासरचे हे चित्र पाहून आर्या मनातल्या मनात खुप रडली. एकदा दोनदा आईला तिने सांगायचा प्रयत्न ही केला पण परत मागे फिरायची कारण पाठीवर तीन बहिणी होत्या. त्याही बापाला अश्याच ऊजवायच्या होत्या.

  हो,बापाला कारण बाप म्हणायची पण त्याची लायकी नव्हती.मुलाच्या हव्यासापोटी त्यानेच चार पोरी जन्माला घातल्या.तीन पोरीच्या पाठीवर दिवटे चिरंजीव जन्माला आले. 

  मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. लहानपणापासूनच त्याचे भिकार लाड. पोरी एका पाठोपाठच्या कपडे थोरलीला घेतले कि,मागच्या तिघी आलटून पालटून घालणार.चिरंजीव मात्र प्रत्येक सणाला नवीन पोशाखात मिरवणार.धाकटीला समजायचे नाही ती हट्ट करायची नवीन वस्तूसाठी.


  तेंव्हा तिला ऐकायला मिळायचे मागच्या जन्मीच पाप म्हणून मुलीचा जन्म मिळाला.आता नवऱ्याच्या घरी गेल्यावर हौस मौज.तिला समजायचे नाही. ती आईला म्हणायची आई कर ना माझं लवकर लग्न म्हणजे मला नवीन कपडे मिळतील.


  आर्या त्यामानाने वयापेक्षा लवकरच मोठी झाली.कारण आईची तीन बाळंतपण तिलाच करावी लागली. आज्जी फक्त नावालाच आली होती. येता जाता आईला टोमणे मारायची.लवकर पोराला जन्माला घाला. मला होत नाही आता दरवर्षी तुमचा पाळणा हलतो. 


 आई चुप बसायची.आतल्या आत रडायची. माझ्या का एकटीच्या हातात आहे हे?बस्स झाले मला पण झेपत नाही आता!


  पण बाप हट्टाला पेटायचा.पाहिजे तेंव्हा कार्यभाग उरकून मोकळा व्हायचा. तिथे तिच्या इच्छा अनिच्छेचा प्रश्नच नसायचा.पाचव्या वेळी तर बापाने चक्क धमकावलेच. यावेळी मुलगा झाला नाही तर तुझी माहेरी रवानगी.दुसरं लग्न करेल. 


  बाळंतपण कसली ती फक्त मुले जन्माला घालायची मशीनच बनली होती.आई पंधराव्या दिवशीच कामाला लागायची.


  आई परत पाचव्यांदा गरोदर आता पोरगी झाली तर हिच्या सहित चार पोरींना घेऊन माहेरी.पण तिथं तरी कोण आहे.आपली आईचं भावाच्या जिवावर राहते. काय करावं गुपचूप जाऊन पाडावं का? पण तिथं पण दोघांची सही लागते. त्यापरी जीव द्यावा पण माझी चिल्लीपिल्ली कोठे सोडू? मनातले विचार मनातच.आई शांत राहिली. 


 आर्या थोडी वयाच्या मानाने फारच समंजस झाली होती.ती आईला म्हणालीच,आई थांबव सगळे तुझी तब्येत बघ.जाशील एके दिवशी आम्हाला पोरके करून म्हणून आईला व बहिणींना बिलगून मनमोकळे करायची.

   

  आईची बाळंतपणं आणि बहिनींचं संगोपण आर्या मोठी बहीण बनून सगळी कृतव्य निभावायची. मिळेल तसा आभ्यास करायची.हुशार होती.


  शेवटी परमेश्वराला दया आली आणि आईला चार पोरींच्या पाठीवर पुत्ररत्न झाले.मग मात्र या चौघी अजूनच डावलल्या जाऊ लागल्या.मुली आता आपआपल्याच मोठ्या होऊ लागल्या हट्ट काय असतो तेच त्या विसरल्या .आभ्यासात चूणूक दाखवत होत्या.आपल्या प्रगतीचा आनंद चौघीच आणि आई मध्ये शेअर करत. 


  आईला वाटायचे जाऊ दे माझ्या लेकी शिकून सवरूण मोठ्या होतील कमवतील स्वतःहाच्या पायावर उभं राहतील मग भेटेल स्वप्नातला राजकुमार चौघीनांही आणि सगळे स्वप्न पूर्ण करेल फार अबाळ झाली माझ्या पोरीची पण पुढे नको रे भोगायला लावू नको रे.


  चिरंजीव मात्र स्व:हाताच्या मस्त धुंदीत जगत होते.शिक्षणाच्या नावाखाली बरेच धंदे करत होते.पोरी चाणाक्ष होत्या.परस्पर आईच्या कानावर त्यांनी या गोष्टी घातल्या.पण आईची हिंमत होत नव्हती वडींलापर्यत पोहचवण्याची. 


  एकदा दोनदा आईने प्रयत्न केलाही पण वडीलांना सांगण्याचा. पोरावर लक्ष ठेवा हे. पण बापाने धूडकावून लावले.तो शिकतोय हुशार आहे. तुझ्या पोरींना तेवढी हुशारी नाही म्हणून तु जळतेस चक्क या शब्दात तिची कानउघाडणी केली.


  शेवटी व्हायचे तेच झाले.मोठ्या ड्रग्स रॅकेट पोरगा अडकला आणि पकडला गेला. आता त्याला सोडविण्यासाठी लाखोंची गरज होती पैसा?


  तेंव्हा बापाचे डोळे उघडले त्यापायी त्यांनी आर्याशी खेळी खेळली.नाहक बळी आर्याचा बळी घेतला. पैशासाठी चक्क बापाने आर्याचाच लिलाव केला.


  पैसेवालं स्थळ आर्यासाठी चालून आले अशी अफवा पसरवून मुलाची चौकशी न करता बापाने होकार दिला. आर्याचं मत विचारात घेतलं देखील नाही.

   

  आर्याला तिचाच सहकारी लग्नाची मागणी घालत होता.सुस्वभावाची कुटुंबवत्सल होता.अगदी मनापासून आर्यावर प्रेम करत होता.पण बापाला तो पसंत पडला नाही. 


   त्याने चक्क धमकीच दिली. त्याच्याशी लग्न करशील तर या घराला मुकशील.चांगले गर्भश्रीमंत स्थळ चालून आले आहे आणि हिला भिकेचे डोहाळे लागलेत? 


  शेवटी प्रेमाला तिलांजली मिळाली. बापाने या स्थळासाठी मुलांकडूनच पैसे उचलले. कारण बाहेरख्याली पोरांचे कारनामे जगजाहीर होते. मुलाला मुलगी मिळत नव्हती.घरात सासूबाईंचा पण वेगळाच कारभार होता.एकंदरीत घरात अवगुणांचा स्वैर संचार!. 


 लग्न गुपचूपच केले.बापाने पैसे उचलले आपल्या पोराला सोडवले आणि पोरीला मात्र चक्क कुंटणखान्यात अडकवले.


  वर वर सभ्य दिसणारे घर चक्क कुंटणखाना होता.भोळ्या भाबड्या पोरींचा नाहक बळी गेला.ज्या नवऱ्याच्या नावाने कपाळी कुंकू लावलेले तो नवरा दलाल होता तर.


  नणंद दिर हे ही पात्र त्यांनाच मिळालेली.तीही अशीच पैसे देऊन विकत घेतलेली. 


  आज आर्याच्या आयुष्याशी खेळणारा तिचा बाप या कट कारस्थानात सामिल होता तर? माहित असूनही या पोटच्या पोरीशी इतके गलिच्छ शी ss?  


 आई बिचारी अज्ञातच आई तु वेळीच आवाज उठविला असतास तर ? पुढे माझ्या चार बहिणी कोवळ्या कळ्या, त्यांच्या पण आयुष्याची अशीच होळी? नक्कीच नाही, यासाठी काही तरी करायलाच हावे. 


  या विचारात असतानाच तिच्या खोलीचे दार वाजले,सासूनामक व्यक्ती दारात उभी राहून तिला सुचना देत होती. तयार हो पाहूणे येताहेत .


   आर्या शहारली,अर्थमेली होऊन थरथरु लागली म्हणूनच तिने आईला फोन लावला आई सहन ही होत नाही सांगता पण येत नाही.


   माझ्या तर आता आयुष्याची राखरांगोळी झाली ग! पण पुढे या तिघींच्या तरी पाठीशी ठामपणे उभी राहशील.आई आता तरी आपलं मत मांडायला शिकशील?


 पण सगळे मनातच राहिले सहन न होणाऱ्या आणि सांगताही न येणाऱ्या वस्तुस्थितीला तिला सामोरे जावे लागले. मन मारून डोळे बंद करून!.. 


Rate this content
Log in