Shubhankar Malekar

Children Stories Others

4.9  

Shubhankar Malekar

Children Stories Others

आई जेव्हा आजारी पडते.....

आई जेव्हा आजारी पडते.....

3 mins
1.9K


     आम्ही एका छोट्याश्या चाळीमध्ये राहायचो. मी माझ्या आई,बाबा,भाऊ आणि आजोबां सोबत रहायचो. आई आमच्या घराचा आधार स्तंभ होती. आई आमच्या सर्वांची खुप काळजी घ्यायची. सकाळी उठुन पाणी भरणे, बाबांना आणि आम्हा मुलांना डब्बा करुन देणे,घराची साफ सफाई करणे,आजोबांना वेळेवर औषध देणे,आमचा अभ्यास घेणे,जेवण करणे,घराची आवरा आवर करणे अशी अनेक काम आई एकटीच करायची. आई नेहमीच सगळ्यांची काळजी घ्यायची.


      एकदा सकाळी आईला अचानक चक्करच आली. माझा लहान भाऊ खुप घाबरला. बाबांनी ताबडतोब डॉक्टरांना फोन केला. बाबांनी त्या दिवशी सुट्टीच घेतली. काही वेळाने डॉक्टर घरी आले. त्यांनी आईला तपासले. ते बोलले,"ह्यांचे ब्लड प्रेशर वाढले आहे,त्यामुळे त्यांना चक्कर आली.ह्यांना काही दिवस आरामाची गरज आहे.मी काही गोळ्या लिहुन देतो त्या त्यांना वेळेवर द्या."काही वेळाने डॉक्टर निघुन गेले.

बाबा-"उषा,कसलं इतका टेंशन घेतलस?अचानक ब्लड प्रेशर कसे वाढले?"


आई-"अहो,काही नाही.मी ठिक आहे,मला काही नाही झालं.मी तुम्हाला तुमचा डब्बा करुन देते."


बाबा-"अजिबात नाही,तु आराम कर.मी आज सुट्टी घेतली आहे.मी शुभांकरला मदतीला घेऊन घरातली सगळी काम करतो."


आई-"अहो,मी ठिक आहे.मी करते काम."


बाबा-"एक शब्द ही बोलु नकोस.तु आज फक्त आणि फक्त आराम कर."

(मग मी आणि बाबा स्वयंपाक घरात गेलो.)

    

     बाबांनी आणि मी आज खिचडी करायचे ठरवले होते.त्यासाठी आम्हाला तांदुळ,तुरीची डाळ,हळद,मिठ,मिरची अश्या काही वस्तु लागणार होत्या.आम्हाला सर्व गोष्टी मिळाल्या मात्र डाळ मिळाली नाही.मग आम्ही एक एक डब्बा उघडुन बघितला .एक डब्बा उघडतच नव्हता म्हणुन मी तो जोर लाऊन उघडण्याचा प्रयत्न केला.तो डब्बा उघडला आणि माझ्या हातातुन खाली पडला.त्याच डब्ब्यात तुरीची डाळ होती.सगळी डाळ खाली पडली होती.कामात काम वाढत होते.आईचा बाहेरुन आवाज आला,"शुभांकर काय झालं?कसला हा आवाज?"बाबा बोलले,"काही नाही."बाबांनी मला मग बाहेर आजोबांना गोळ्या देण्यासाठी पाठवले.


        मी बाहेर गेलो.पण मला माहीत नव्हते की आजोबांना कोणत्या गोळ्या द्यायच्या आहेत.आई तेव्हा झोपी गेली होती.मी आजोबांना विचारले,"आजोबा तुम्हाला माहीत आहे का कोणत्या गोळ्या घ्यायच्या आहेत?"त्यांनी काही गोळ्या सांगितल्या मात्र मी आईला सकाळी वेगळ्या गोळ्या देताना बघितला होता. मग मी बाबांकडे गेलो.बाबांनी मला आजोबांना कोणत्या गोळ्या द्यायचे ते सांगितले. मग मी आजोबांना त्या गोळ्या दिल्या.तेवढ्यात माझ्या लहान भावाने खेळता खेळता बाबांनी ठेवलेला चहाचा कप खाली पाडला.एक काम संपले की दुसरे काम तयारच असायचे.बाबा त्याचा आवाज ऐकुन बाहेर आले.बाबांनी मला स्वयंपाक घरात पाठवले आणि सांगितले की,"1 शिट्टी झाली आहे.अजुन 2 बाकी आहेत,त्या झाल्या की गैस बंद करुन टाक.तो पर्यंत मी हे साफ करतो."तेवढ्यात बाबांना त्यांच्या कामा वरुन फोन आला.ते त्यांच्याशी बोलण्यासाठी बाहेर गेले.मी आत गेलो,तेव्हा अजुन एक शिट्टी झाली.तेवढयात आमच्या शेजारच्या काकु आमच्या घरी आल्या.त्यांनी मला आवाज दिला म्हणुन मी बाहेर गेलो.


    त्यांना मी सगळे काही सांगीतले.तेवढयात आतुन जळण्याचा वास आला.बाबा ही फोन ठेउन आत आले.आम्ही धावत धावत आत गेलो.बघतो तर काय!जेवन करपले होते.तिसरी शिट्टी केव्हा झाली मला कळलेच नाही.आता आम्हाला हा प्रश्न पडला होता की,"आता जेवणाचा काय करायचं?"कारण आईची तब्बेत ठिक नव्हती आणि तिला बाहेरच जेवण देणे योग्य नव्हते.तेव्हा मला प्रश्न पडला की,"आई इतकी कामं एकटीच कशी करत असेल?."


काकु-"जेवण तर करपले.तुम्ही आज आमच्या घरी जेवायला चला."

बाबा-"अहो नको,आमच्या मुळे तुम्हाला कशाला त्रास."

काकु-"अहो ह्यात त्रास कसला!मागच्या वेळी मी आजारी पडलेले,तेव्हा वहिनींनीच आमच्या घरी येउन आमच्यासाठी जेवण केलेलं."

बाबा-"ठिक आहे,आम्ही येऊ जेवायला तुमच्याकडे."


     आम्ही त्या दिवशी शेजारच्या काकुंकडेच जेवलो.आईला आम्ही सगळी हकीकत सांगितली.आई आम्हाला बोलली,"होता असा कधी तरी."तेव्हा मला प्रश्न पडला की,"आई इतकी कामं एकटीच कशी करत असेल?"त्या दिवशी मला जाणवले की,जेव्हा आई आजारी पडते तेव्हा सगळीच कामे ठप्प होतात.घरातल्या कामांचे संतुलन बिघडते.कोणतीच काम वेळेवर होत नाहीत.जर भाजीत मिठ जास्त झाले तर आपण आईला बोलायचो आणि जर हिच गोष्ट आपल्या कडुन झाली असती आणि आपल्याला कोण बोललं असता,तर आपल्याला खुप वाईट वाटले असते म्हणुन आपण आईला समजुन घेतले पाहिजे.आई एकटीच घरात खुप काम करते.कधी कधी कामात गडबड होऊ शकते,त्यावरुन कधीही आईला आपण बोललो नाही पाहिजे.आईला आधीच इतक्या कामाचे टेंशन असते,त्यात आपण अजुन तिला टेंशन दिले तर तिची तब्बेत नेहमी बिघडत राहील.म्हणुन प्रत्येकाने आपल्या आईचा आदर केला पाहिजे,तिला कामात मदद केली पाहिजे आणि तिला समजुन घेतले पाहिजे.

            


Rate this content
Log in