आई-बाबांची माया
आई-बाबांची माया


मुक्ता सारखी म्हणायची आहो बाबा! कशाला येवढ़ा त्रास करून माझ्यासाठी सकाळी डब्बा आणता?
त्यचात काय त्रास मुली! लग्न होऊन एक वर्ष ही पूर्ण नाही झाले आणि एका-जागेवर राहून तुझ्या गरोदरपणात मी येवढ़तर करूच शकतो. एकतर 9.00 वाजता ऑफिस असल्यामुळे अश्या स्थितीत तुझी ही घरातली जबाबदारी संपूर्णपणे पारपाडून मग स्वताचे आवरून धावपळ होतच असेल!.... नाही का? सुट्टी अत्ता नाही घ्यायची हा तुझा निर्णय म्हंटल्यावर, ही आम्ही दोघांचीही माया! ती पण एक आई! आणि तू आई होणार मग तुझे डोहाळे पुरवायला आईने मस्त तुप लाऊन पोळी, तुझी आवडती भरलेली भेंडी,सलाद आणि चमचमीत-लोणचं दिलय!
बाबांचे असे स्नेह पहिल्यांदा झळकताना आनंदरूपी-खोलीत ती रमलेली होती.