२६, जुलै
२६, जुलै
सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू होती . पाऊस असेल तर शाळेतील मुलांची संख्या जास्त असते." अरे एवढा पाऊस आहे कशाला आला पावसात ?"रेखा म्हणाली. आई म्हणाली" रोजच पाऊस पडतो रोज घरी बसणार. त्यांचं काय चुकलं घरात पाणी भरत. सुरक्षितेसाठी शाळा योग्य वाटते." पाऊस काही थांबत नव्हता. ट्रेन बंद झाल्या होत्या. मुख्याध्यापक आपल्या निर्णयावर ठाम होते. शाळा वेळेवरच सुटेल. सर्वांचा जीव टांगणीला लागला होता. आता जे काही मिळेल त्याने घरी जायचे. शाळा सुटली. तसेच सर्व शिक्षक धावत प्लॅटफॉर्मवर आले. इंडिकेटर झीरो झीरो दाखवत होते. पाण्याचा वेग वाढत होता हळूहळू प्लॅटफॉर्मवर पाण्याने भरून आला. तसे धावत ब्रिज पार केले. तिकडे पाणी भरले होते. काही सुचत नव्हते. "रेखा आपल्याला आता काय मिळेल ते साधन पाहून बाहेर पडलं पाहिजे." सर्वांना हात दाखवत होतो. लोक खूप गर्दी करत होते. कसेबसे एक जीप गाडी मिळाली. चौघी चढलो. वाशी ला येऊन गाडी बंद पडली. पाऊस पडत होता. आंधार होऊ लागला. तशी मनात भिती वाढली. रेखा च्या डोळ्यात पाणी आले. तिचे पती मुंबई नोकरी ला गेले होते. ते परत आले असतील का. आपण कधी पोहोचू?. लेकरं घरात काय करतील. एक ना दोन अनेक विचार मनात थैमान घालत होते. वाशीत अडकलो पुढे जाणार कसे. प्रत्येकाला हात दाखवत होतो.
एका कारवालाने चौघींना नेरूळ पर्यंत सोडले.
"चला माझ्या घरी जाऊया "शारदा म्हणाली. अंधार खूप झाला होता सर्व लाईट गेल्या होत्या. मोबाईल चे नेट चालत नव्हते. मोबाईल बंद झाला होता. सर्वांशी संपर्क तुटला होता. आम्ही चालत होतं. पावसाने चिंब भिजलेले. तेवढ्यात शारदा ओरडली. "अरे बापरे येथे पाणी भरलं. माझ्या घरात जाताच येणार नाही. पहिला मजला ही बुडालाय. "
आता सगळे पर्याय बंद झाले होते. एवढ्या अंधारात आम्ही महिला कुठे जाणार. खूप घाबरलो. "थांबा थांबा माझी मैत्रीण रस्त्यावरच राहते तिच्याकडे जाऊ या "शारदा म्हणाली.
"रमा आहेस का घरी. अरे तुम्ही या आत मध्ये या. हे पहा गरम-गरम मी काहीतरी करते . तुम्ही सर्वांनी जेवा. शारदा ची मैत्रीण आली. आम्ही सर्व जेवलो. हे पहा. माझं घर छोटा आहे. तुम्ही पहिल्या मजल्यावर माझ्या मैत्रिणीच्या घरी जा. तीही अजून परतली नाही. तिची मुलगी एकटी आहे. तिला सोबत होईल." आजची रात्र काढणं खूप कठीण होतं. पावसात भिजून सुद्धा थंडी वाजत नव्हती. सारखा मनात विचार चालू होता. पती मुले घर काय करत असतील
ते सुखरूप असतील ना. देवा आमचं कुटुंब सुखी असू दे. रात्र सरत नव्हती.
रेखासारखी घड्याळ पाहत होती. झोप लागत नव्हती. लेकरू उपाशी असतील का. बिल्डिंग मध्ये .पाणी तर भरले नसेल ना. अनेक विचारांचे काहूर झोपू देत नव्हते.
सकाळ होताच सगळे जाण्याची तयारी करू लागली. तोपर्यंत पनवेल ला जाणारी बस सुरू झाली होती. रेखाने धावतच बस पकडली. पनवेलला येताच समजले खालच्या सगळ्या इमारती पहिल्या मजल्यापर्यंत बुडालेले आहेत. पाय लटपटू लागले काळजात धडधडा अधिक वाढली. पुढे काय चित्र असणार आहे माहीत नव्हतं. ती आपल्या इमारतीजवळ आली. लाईट नव्हत्याच. कसेबसे पाचवा मजला गाठला. बेल वाजवली
. "आई आली." धावतच मुलाने दरवाजा उघडला.
आई असे म्हणत सर्व मुलांनी मिठी मारली." माझ्या सोन्या "असे म्हणत रेखा"
आपल्या मुलांना कुरवाळू लागली." बाबा आले ना." "नाही आई." मुले म्हणाली." काय?" रेखा ओरडली कसा संपर्क करायचा. तिला काय करावे तेच कळेना. पाऊस अजूनही पडत होता. तेवढ्यात बेल वाजली. दार उघडले. बाबा उभे होते. सगळे मुले धावत बाबांना बिलगली. रेखा तर रडूच लागली
"अगं देवाच्या कृपेने आपण सगळे सुरक्षित आहोत. यातच धन्यता मान." रेखाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. पाऊस ही जणू तिला साथ देत होता