100 शब्दांची गोष्ट
100 शब्दांची गोष्ट


अरु अग प्रॉब्लेम कोणाच्या आयुष्यात नसतात? म्हणून काय जगणं सोडून द्यायच असत का? तुझं आणि तुझ्या नवऱ्याचं पटत नाही तो तुला किंमत देत नाही मग तू तुझं आयुष्य जग तुझ्या मनासारखं आणि बाकी सगळं इग्नोर कर. निषाद अरु ला समजावत होता.आज ते कॉलेज च्या रियुनियन ला एकत्र आले होते. निषाद म्हणाला, आठवत का तुला अरु तू किती छान पेंटीग्ज करायचीस. हो ते तर मी विसरूनच गेले. मग आता पुन्हा नव्याने सुरवात कर नवनवीन रंगानी आयुष्य भरून टाक मग दुःखाचा कोणताच रंग तुला उदास नाही करणार. पुन्हा त्या जुन्या अरु ला जिंवत कर आणि नवीन वर्षांचे स्वागत तुझ्या अनोख्या रंगांनी कर.