युवा मन
युवा मन
1 min
155
गतकाळाची "पाने" उघडून
"अनिष्ट प्रथा" उखडून टाकू
नवं क्षितिजावर "आव्हानात्मक"
आयुष्याचे "पाणी" चाखू...........१
उरी अमुच्या एकच "ध्यास"
घडवू "संस्कारक्षम" हा "भारत"
हरेक "नागरिक" होईल "शिक्षित"
हीच अमुची असेल "दानत"..........२
आदर्श नैतिकतेचा "वसा" घेऊनी
आरंभले "सत्र" नव्या "युगाचे"
"जातपात" विसरून सारे
"ध्येयवादी स्वप्न" साकारू उद्याचे..........३
वंदनीय आम्हा "धरणीमाता"
उजळू "ज्ञानदिप" शिक्षणाचा
समाजसेवेचा "वसा" घेऊनी
"पाया" रोवू "समतेचा"...........४
"युवा" असे "सूर्य" उद्याचा
उत्कर्ष "नवं चैतन्याचा"
"ज्ञानोपासक भारत" घडवी
"आशावादी" नवं "प्रकाशाचा"..........५
