युक्ती
युक्ती
1 min
347
आजीची आवडलेली कविता
चल रे भोपळ्या टुणूक टुणूक
म्हणाली होती वाघाला तेव्हा
तूप रोटी खावून येतो दुडूक दुडूक
कधी कधी जीवनात मात्र
काम करत नाही शक्ती
ती तर नव्हती आजीकडे
पण कामात आली युक्ती
आजीच्या समोर तेव्हा
वाघ रुपी यम उभा राहिला
आजीची चाणाक्ष बुध्दी
आली होती कामाला
भुकेलेला वाघ थांबला
वाट अडवून बसून राहिला
एक दिवस भोपळा जवळून गेला
आजीने मात्र जीव वाचवला
हतबल होऊन वाघ मग
दुर जंगलात निघून गेला
स्वतःला दोष देऊन बसला
आजीने विश्वास घात केला
