STORYMIRROR

Sandeep Dhakne

Others

3  

Sandeep Dhakne

Others

यष्टी

यष्टी

1 min
313

साधी सुधी गोष्ट नव्हती

यष्टी गावात यायची

कच्या पक्का सस्त्याने

धडपडत जगायची ।।


ओस पडली सारी गावे

मातीचा धुरळा उडाला

गावाच्या नशिबी खड्डे

शहरात पक्का रस्ता झाला ।।


जमीनीला पडल्या भेगा 

पाऊस अचानक रूसला

शहरात गेलेला पोरगा 

गाव मातीचे विसरला ।।


यष्टी रोज येत होती

पोरं गलकां करत होती

पोरा–सोरांची भेट व्हायची

आजोबाची माया मिळायची ।।


तरणीताठी शिकलेली पोरं 

गावाला जुमानत नाही

शहरातली गोड सुनबाई 

गावात तिला करमत नाही ।।


गावात यष्टी फिरकत नाही

जुन्या आठवणी मिटत नाही

सुख दुःखाच्या गोष्टी सांगाया

यष्टीच आता भेटत नाही ।।


Rate this content
Log in