यश शिखरावर
यश शिखरावर
1 min
38
प्रयत्नाने यश मिळतेच मिळते
जसे हात दोरखंड धरते
कधी सुटतो ताबा हाताचा
मार्ग चालू खडतर वाटांचा
नजर ध्येयावर पकड मनावर
चुटकीसरशी न्याल यश शिखरावर
सगळं कसं भरभक्कम हवं
उंची गाठून नभात मिसळाव
ध्येय प्राप्ती झाली जरी
गर्व आणू नका उरी
