यश निर्धार...
यश निर्धार...
1 min
222
कधी कधी सहज पडतो
एक गूढ विचारी प्रश्न
कासवासारखा मंद गतीने
चाललेला जीवनप्रवास
खरंच असतो का साहसी....
जो नक्कीच होईल यशस्वी
की असते फसवणारी चाल
जी चुकवते आपली वाट
शर्यतीतला वेगाने धावणारा
ससाच पोहचवतो का इच्छित स्थळी...
की आपलाच नडतो धुर्तपणा
ज्यात अडकलेल्या आपल्याला
नसते भान कसे निघावे बाहेर
वेदनांच्या या चक्रव्यूहातून
असेल ज्याचा यश निर्धार...
