STORYMIRROR

Ramkrishna Nagargoje

Others

3  

Ramkrishna Nagargoje

Others

येतो पांडूरंगा

येतो पांडूरंगा

1 min
105

नेत्री पाणी वाहे,

का सुकला चेहरा,

मौन का धरले ?

का शब्द फुटेना ? 

सांगा पांडूरंगा,

काय झाले ?


संत साधू जन,

पंढरीसी आले,

वारकरी पाऊल,

पताका नाचे.


चंद्रभागा माय,

दोन्ही तीर, वाहते,

आज काय झाले ?

पाणी वाहे शांत,

वारकरी कन्या,पुत्रा,

भेटतसे.


पुंडलिक भक्त,

धन्य धन्य झाला,

वारकर्यासाठी,

केला देव उभा.


परत फिरलो आता,

यावे आळंदीसी,

इंद्रायणी तिरी,

ज्ञानाचा सागर,

ज्ञानीया वाचे,

ज्ञानेश्वरी.


संसार वाहतो,

दुःखाचे पर्वत,

विठ्ठला तुझ्या कृपे,

तरलो तरलो.



Rate this content
Log in