*"येती प्रेमात जातीही प्रेमा
*"येती प्रेमात जातीही प्रेमा
हसणारे सूर्य चंद्र, तारे दैनंदिन
करी वस्ती क्षितिजाच्या कवेत
दिलदार ही निसर्गाचे चेहरे
येती प्रेमाने जातीही प्रेमात....
हृदय स्पंदन करती खोड्या
गीत लहरीतून उमलती भाव
समजुन घेण्या इथे लागतो
धैर्य, नम्रतेचा सुप्त अविर्भाव..
घेशील म्हणूनच जवळी बसले
कर तू तयांचे मार्गदर्शन स्विकार
कल्यानाची ही अनमोल पताका
पतनमार्गाचे बुजविती खिंडार..
डोळ्यातुनी हे भाव उमटती
अबोल वाणी साक्षात बोलती
ऐकूनी घे विचार अमुल्य अन्
मानुसकी दे तयाच्या हाती...
काल होता आंधार पसरूनी
आजच्याला गिळण्याकरीता फार
कधीच न संपणारी असंख्य वादळे
रोकण्याकरीता दूत हो तयार...
