STORYMIRROR

Anil Chandak

Others

3  

Anil Chandak

Others

येता दुष्काळ

येता दुष्काळ

1 min
325

दिवसांपाठी, दिवस जातो,

सुर्य ही अस्ताला चालला!

पानगळ,ही सुरू झाली,

अजून ही पाणी नाही पिकाला !!1


अवर्षणाची,ग्रस्त छाया पडली,

अवनीला,आस पावसाची !

वारा,ढगांना पळवून लावी,

बळीराजाला ,काळजी पिक पाण्याची!!2




किती दिवस,मोजायचे आता,

पावसाची वाट,कुठवर पहायची!!

निष्ठूर ,झाला कसा रे देवा,

कां तुझी नाही कां ,काही जबाबदारी!!3




अंधाराची,काळी छाया पसरली,

आता इथे,वसुंधरेवरती!

डोंगरदऱ्याआड,किरणातून,

पांढरे ढग,वाकुल्या दाखवती!!4




देवा,तुझीच आम्हां आशा होती,

बघ ना ,धरणी भेगाळली कशी!

तुलाच,पाझर फुटत नाही,

तर मेघांना,काय पाऊस पाडण्याशी!!5




रानमाळ हे कोरडे ठाकले,

कुठे दिसेना,चिटपाखरू ही!

लाचार झाला,माणुस इथला,

अन्न पाण्याविना,मेली जित्राबं ही !!6




गोकुळातल्या,लोकांसाठी,

गोवर्धन,उचलला करंगळीवरी!

जीवन ,जगणे असह्य झाले,

आमची ,भिस्ती आता

 तुझ्यावरी!!7


Rate this content
Log in