यालाच प्रेम असे म्हणतात
यालाच प्रेम असे म्हणतात
तू असतोस जवळी माझ्या
भान मला नसे काही
तू असतो जीवनी माझ्या
नसे चिंता मनी माझ्या
वाटतो हेवा या जीवनाचा
नेहमी तु मनी माझ्या असावा
वाटेना दुरावा वाटेना विरह
तू नेहमी माझ्या मनी असावा
का असते मनी ही लालसा
याचे उत्तर ना असे कोणा जवळी
यालाच तर म्हणत नाही ना प्रेम
हो हे प्रेमाचं तर असत की
ते वेड लावून जातं वेड लावून जातं
प्रेम कशाला म्हणतात असे विचारता
अरे प्रेमाची व्याख्या ही सांगता येत नसते
तिला काही व्याख्या नसते ना तीला कधी अंत असतो
प्रेम हे चिरकाल टिकणारा असतं
प्रेमाचं नातं हे कधी न संपणार असतं
प्रेमाच्या शालीला हवा सुखाचा धागा
हा धागा विणावा प्रेमाच्या स्पर्शाने
ह्या स्पर्शाने ऊब घ्यावी एकमेकांच्या साथीने
