STORYMIRROR

Ramkrishna Nagargoje

Others

4  

Ramkrishna Nagargoje

Others

या सुखा कारणे

या सुखा कारणे

1 min
396

या सुखा कारणे,

बहु जन्म सोसले,

या शांती कारणे,

सोसल्या धावा,

शांत केले मन,

शांत केली धाव,

पाहिला देव,

विठ्ठल विठ्ठल.


या सुखाकारणे,

आलो पंढरीशी,

भेटली भेटली,

माय रुखमाई.

आसं जन्माची,

पूर्ण झाली.


या सुखाकारणे,

उजळली पहाट,

काकड आरती,

पाहिली,पाहिली,

चैतन्य पांडुरंग,

उभे नारायण.


या सुखाकारणे,

बहु जन्म सोसले,

महाराष्ट्र देशी,

जन्मा आलो,

पाहिला पाहिला,

विठ्ठल सावळा,

नको आता रंग,

एक सावळा पाहिला,

विठ्ठल विठ्ठल ,

उभे नारायण.


या सुखाकारणे,

बहु जन्म सोसले,

महाराष्ट्र देशी,

जन्मा आलो.


साहित्याला गुण द्या
लॉग इन