STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Others

3  

Neha Ranalkar(Nawate)

Others

या काळापुढील आव्हाने

या काळापुढील आव्हाने

1 min
208

या काळापुढील आव्हाने


आजच्या या युगापुढील आव्हाने,

दिवसेंदिवस आहेत खूप वाढत!

नैसर्गिक आपत्ती ,व्यसनाधीनता,

महागाई,बेरोजगारी आहे वाढत!!

हवा,पाणी प्रदूषण,वाढते तापमान

शेतकरी दुष्काळाने आहे त्रस्त!

निराशा,गरीबी वाढते लाचारपणा 

परीणामी कैक आत्महत्याग्रस्त!!

पैसा वाल्यांकडचा पैशांचाओघ

अतीच वाढत आहे!

सण साजरा करण्यासाठी गरीब

कर्जच काढत आहे!!

लोकसंख्येच्या भस्मासूर आणखी

समस्यांमध्ये घालतोय भर!

स्रिया, मुलींवरील अत्याचाराच्या

घटनांचा कमी होइना दर!!

वाढते शहरीकरण, संगणकीकरण

डोकेदुखी बनत आहे!

जग येत आहे खूप खूप जवळ

आत्मियता घटत आहे!!



Rate this content
Log in