या गं कातरवेळी
या गं कातरवेळी
1 min
384
या गं कातरवेळी नी सांजसकाळी
आठवांचा पूर बरसे वेळी अवेळी !! ध्रुव !!
हुरहूर लावी, निशब्द ओढीचा वारा
हेलकावे खाती, हृदयी विरह मारा
का शांत झाली ही, सदा झुलणारी लव्हाळी
आठवांचा पूर बरसे वेळी अवेळी !!१ !!
चिंब पावसात,अल्लड तुझं नाचणं
विसरुनी सारं,बालरुपी गं वागणं
त्या क्षणपुष्पांची,झाली पाकळी पाकळी
आठवांचा पूर बरसे वेळी अवेळी !! २ !!
वचन दोघे घेऊ, साथ अबाधित ठेवू
या प्रित धाग्याला, रेशीम बंध बनवू
साक्षीला सये गं, होती रात्र ती सावळी
आठवांचा पूर बरसे वेळी अवेळी !!३ !!
