STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Others

4  

Neha Ranalkar(Nawate)

Others

व्यथा कवीची कथा कवितेची!

व्यथा कवीची कथा कवितेची!

1 min
170

कविते ! कविते! तु आहेस तरी कशी?

पावसाची सर जशी तशीच होतेस दिसेनाशी!!१


सारखी सारखी माझ्या अंत:करणात डोकावते!

लिहावी कागदावर तर

केंव्हाच अंतर्धान पावते!!२


विचारांनी तुझ्या मी झाले गं घायाळ!

तुझ्या दिव्यते पुढे कशी शिजावी माझी डाळ?!३


वेड मला लावलय तुझ्या ध्यासानं!

पुरे कर छळ मिटवूयात हे गा-हाणं!!४


लेखणीतून हो प्रकट अन्यथा चालती हो जा! 

कुठल्या माझ्या पापांची मला देते आहेस तू सजा?!५


शोधून शोधून तुला फार गं थकत चालले!

विचाराअंती मृत्यूपंथाला मी लागले!!६


ज्याला पावतेस तू तो ठरे श्रेष्ठ कवी !

मजवरी पण करी कृपा तू गे शारदादेवी!!७


नसेल पावणार तर अशी छळू तरी नकोस!

जिवंतपणी विरहात या जाळू तरी नकोस!!८



Rate this content
Log in