वय असंच असतं
वय असंच असतं
1 min
197
हे वयच असं असतं
मुलामुलींना नसते भान
नसते कशाचीही जाण
शरीररुपी आकर्षण असतं
हे वयच असं असतं
आपल्याच धुंदीत रमतात
आपल्याच मस्तीत फिरतात
मैत्रीचं वारं डोक्यात असतं
हे वयच असं असतं
नको असते कोणाचे बंधन
स्वैर फिरावे वाटते स्पंदन
पूर्ण स्वातंत्र्य हवं असतं
हे वयच असं असतं
या वयात झालेली एक चूक
आयुष्यभर राहते रुखरुख
मोठ्यांचे ऐकलेलं नसतं
हे वयच असं असतं
