वतॆमानपत्र....
वतॆमानपत्र....
1 min
227
आज पुन्हा वर्तमानपत्र आलं आहे,
नव्हतं ते कधीच संपर्क क्षेत्राच्या बाहेर,
फक्त कराेनामुळे संपर्क तुटक हाेत चालला आहे...
आज पुन्हा वर्तमानपत्र आलं आहे,
आता तुमच्यापर्यंत ते नक्की पाेहाेचेल,
फक्त त्याच्यावर प्रेम करणारे वाचक हवे आहे...
आज पुन्हा वर्तमानपत्र आलं आहे,
वर्तमानपत्र म्हणजे लोकशाहिचा चाैथा खांब,
फक्त सुजाण वाचकाचा जनाधार हवा आहे...
आज पुन्हा वर्तमानपत्र आलं आहे,
सोशलमीडिया,इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा आवाज,
फक्त मनामनातले पानोपानी साहित्य अवतरले आहे..
आज पुन्हा वर्तमानपत्र आलं आहे...
आज पुन्हा वर्तमानपत्र आलं आहे...
