STORYMIRROR

Vijay Kadu

Others

3  

Vijay Kadu

Others

वसुंधरा

वसुंधरा

1 min
259

निळ्या हिरव्या करड्या रंगाची

उंच सखल भु भागांची

अनेक ग्रह मंडळी अंंतराळी

त्यात माझी पृथ्वी निराळी 

सूर्य मंंडळात बहु ग्रहांची

आकाश गंगेत तारकांची 

परि ना उजळली कुुस कुणाची 

पृथ्वीमाता माझी सा्ैभाग्याची

सुक्ष्म महाकाय जीवांचा वास

त्यात हिमालयाचे सा्ैंदर्य खास

जल जलाशय महासागर

अल्प भू भाग अस्तित्व थोर

वृक्षवल्ली हिरवीगार

गर्भी अमाप संपत्ती फार

वातावरण कवच कुंंडल

आहे वसुंधरेवर

ऋतूचक्रांचे चक्र

त्यानं जीवन चाले धरेवर

भेद भाव ना तीज पाशी

साऱ्या जीवजंतूस संंभाळती

लाभले आम्हास भाग्य

मानव जात आम्हि भू वरती

 चला एक संकल्प करूया

आपली पृथ्वि सुंदर करूया 

झाडे लावू झाडे जगवुया

भुमातेचे ऋण फेडुया

शपथ घेऊ सारे आपण

घेतला वसा टाकणार नाही

निसर्गाचा ऱ्हास करणार नाही

वृक्षतोड आम्ही करणार नाही 


साहित्याला गुण द्या
लॉग इन