STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

वसुंधरा

वसुंधरा

1 min
171

मनसोक्त बरसतात

रिमझिम पाऊसधारा

चिंबचिंब भिजली ही 

नटखट ,अल्लड वसुंधरा...


  पारिजातकाचा मस्त

   सुगंध गगनी दरवळला

   वसुंधरावर या फुलांचा

   सडा छान हो शिंपडला....


अवखळ अल्लड वारा

बोलतोय मस्त कानात

मातीचा बेधूंद सुगंध

पसरला दाही दिशात,..


  हरीत शालूचे लेणं

   सारी सृष्टी ल्याली

   दवबिंदूंच्या थेंबाने

    अंग अंग मोहरली.....


प्रेमास रंग यावा वसुंधरा 

पावसाने तू मनसोक्त नहाली

येतो अन भिजवतो वसुधेला

वसुधाही मनी अती आनंदली....


Rate this content
Log in