STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

वस्तूंचा भावुक मेळा...

वस्तूंचा भावुक मेळा...

1 min
249

संसारी वस्तूंमध्ये भावनांचे 

जुळे भावुक, प्रेमळ गीत 

आठवणींचा मनी दाटे मेळा 

थाट जणू वाटे मधुर संगीत... १


स्वयंपाकघराचा एक भाग  

जिव्हाळ्याचा असा कोपरा 

नाच, गाण्याचे रंगे कार्यक्रम

आठवणींना उजाळा सारा... २ 


फ्रिज जणू आवडतंच यंत्र 

खमंग भरलेले ज्याचे द्वार

प्रत्येकाचं काहीतरी लपतं 

खास असं गुपित भांडार... ३


भोजन टेबल, सहकुटुंब भोज 

रंगे मैफिलीचा प्रेमळ मांडव 

ताट, वाट्यांचा चाले गजर 

मुद्दामच चमच्यांचा तांडव... ४


टीव्ही मनोरंजनाचा एक पट 

सोफ्यांवर मस्तीचा रंगमंच 

फोटो फ्रेमचा संग्रह उलगडे 

कुटुंबाचा आगळा प्रपंच... ५


शोच्या वस्तू सुंदर आकर्षक 

भेटींच्या रम्य-दिव्य विश्वात 

जडतो खूप व्याकुळ जीव 

हरवून जाई मन स्वप्नात... ६


Rate this content
Log in