STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Others

0.3  

Sanjay Raghunath Sonawane

Others

वसंतराव नारायणराव नाईक-पोवाडा

वसंतराव नारायणराव नाईक-पोवाडा

1 min
29K


धन्य, धन्य क्रांतीवीर, व्ही एन. नाईक

शिक्षणाचे थोर पाईक ,

आस्था शिक्षणाची गरीबांसाठी

संस्था गोदामाईच्या पवित्र काठी

गरीबाला नेता मिळाला ,शिक्षण कार्याला ।जी जी जी


साहेब जन्माला आले,

परमार्थ जीवन वाहिले,

धरतीला सुपुत्र लाभले ,

वेहळगावचे भाग्य उजळले,

नाशिक जिल्ह्याचे भाग्य उजळले।जी जी जी


ग्रामीण भागाचे सुपुत्र लाभले

शेतकरी कुटुंबात जन्मले

माय मातीला आधार झाले

गरीबांचे दुःख पाहिले

नोकरी धंद्याला त्यानी लावले।जी जी जी


कष्टकरी, शेतकरी वर्गाला

मदतीचा हात त्यांनी हो दिला

कळकळ त्यांच्या ह्रदयाला

शिक्षणाचा पाया रोवला

समाजसेवकांचा हातभार संस्थेला

शिक्षणप्रसार खेड्या, खेड्याला ।जी जी जी


असा थोर महापुरुष हरपला

जीवन वाहिले मानव कल्याणाला

पिढ्यांसाठी आदर्श ठेवला

देह त्यांचा सार्थकी लागला

शाहिर संजय सोनवणे गातो पोवाडयाला।जी जी जी


Rate this content
Log in