STORYMIRROR

Vinita Kadam

Others

3  

Vinita Kadam

Others

वसंतगीत

वसंतगीत

1 min
281

आला आला "वसंत" आला 

गाऊ सगळे "मंगलगान"

"नवोन्मेश" ऋतुच्या स्वागता

सृष्टी करी "यशोगान"..........१


"नवचैतन्यमयी"...... "ऋतुराज"

"कोकिळ" कुंजित अतिसुंदर

"मळभ" मनीचे झटकून

येई ऋतुनाम "कुसुमाकर".......२


कोकिळ "दूत" वसंताची

"सुमधुर" सुरेल "गाणे" गाई

सज्ज राही "राजदर्शना"

हिरवी हिरवी. "तृणाई"........३


सुहास्यवदने. "पक्षीगण"

अलंकारित सुंदर. "तनु"

"बालतृणांचे".... "गालिचे"

प्रसन्न मुद्रा लाघवी "मनु"......४


"पाणंदीवरी". सडे "फुलांचे"

सजली काया. "अवनीची"

"मिलिंद" जनाची "ललकारी"

"स्तुतीगीते". पाखरांची........५


उगवता "सूर्य" फेकी  "गुलाल"

"सुगंधी" फुलांची उधळण 

उतरी स्नाने. "दवबिंदू" ते

रंगीत उपवने "वस्त्रभरण"..........६


सुग्रास "वनदेवीचे" "फलभोजन"

सरोवराचे. "अमृत" जल

"मदनोद्यानी" उंच आसनी

"कमल" गंधित "मधु" शीतल..........७


नवल घडे या  "चराचरी"

कोवळे "कोंब" गुलाबी  "कळी

हिरवी , पोपटी "पाने" डोकावती

हासे "चैत्रांगणी" रांगोळी........८


करी समस्त. "वृक्षवल्लरी"

"वसंत" लहरींचे  "मंगलपूजन"

सकल जनांचे "भाग्य" फुलवण्या

होई "ऋतुराज" आगमन...........९


प्रतिक "नवनिर्मितीचे"

संगे यांच्या नाचू गाऊ

"धरणी" फुले लाल केशरी

"हर्षभरित" आनंद भोगू...........१०


"ऋतु" पूर्ण बहरता

"गुलमोहर" फुलदाणी भरे

"रेशमी" फुल "शय्येवर"

"वसंत" मनी "मोद" भरे.......११


Rate this content
Log in