STORYMIRROR

Mrudula Raje

Others

4  

Mrudula Raje

Others

वसंत ऋतू

वसंत ऋतू

1 min
23.9K

आला वसंत

मन मुदित धुंद

होई बेबंद


लाल तांबडा

फुले गुलमोहर

केला कहर


फुले बहावा

हळद माखलेला

हर्ष भारला


रंगे पलाश

सजवी धरणीला

ओढ प्रीतीला


आम्र वनात

हा कुंजतो कोकिळ

नाद मंजूळ


सुवर्ण चाफा

सुगंधे दरवळे

आनंदे खेळे


प्रणय ऋतू

चांदरात बहरे

प्रीती मोहरे


मन मोगरा

होतसे प्रफुल्लित

नाचे वसंत



साहित्याला गुण द्या
लॉग इन