वसंत ऋतु
वसंत ऋतु
ऋतु वसंत फुलला,फुलला हा धरेवरी
नव पालवी फुटली,फुटली मम अंतरी....
वसंत ऋतुचा गाऊ,गाऊ महिमा मी किती
चैत्रमासी प्रतिपदा ,प्रतिपदा ही तीथी...
चैत्र गुढी चैतन्याची,चैतन्याची झुले झुला
मिळे संजीवन साऱ्या, साऱ्या या चराचराला....
असे दिव्य तेज वायु, वायु ऋतू वसंत हा
येतो मंगल करण्या ,करण्या चंगळ अहा....
सांडे अमृत भूवरी,भूवरी या आल्हादुनी
कुसुमाकर हर्षुनी ,हर्षुनी गाते रागिनी......
नवरंग बरसती,बरसती मनोहारी
करीती कुंजन पक्षी,पक्षी वसंत वैखरी.....
जगी वैभव विलसे,विलसे निसर्गात हा
साज भरजरी नवा ,नवा चढे मोहोर हा......
गाती कोकिळ मंजूळ, मंजूळ स्वराचा नाद
समृध्दी भरतो मनी,मनी हर्षभरी दाद.....
