STORYMIRROR

Gangadhar joshi

Others

3  

Gangadhar joshi

Others

वसंत पंचमी

वसंत पंचमी

1 min
261

आला नाचत वसंत बहार

सृजनाचा नव अवतार


आम्रवृक्ष मोहर फुलती

कुहु कूहू कोकीळ बोलती

सुगंधानी पक्षी डोलती

संजीवनी मंत्र घेऊनी

झाला तो साकार


जीर्ण पाने गळूनी पडती

नव पालवी उभार घेती

सृष्टीच्या नियमा प्रीती

नव युगाचा आविष्कार


किती पिढ्यांनी गायीली गाणी

रती मदनाची होऊनी वाणी

पुष्प धनुष्य घेऊन हाती

अाळवती प्रणय शृंगार


ऋणानुबंध दिले घेतले

प्रेमाचे ते गीत फुलवले

एकमेका साह्य करुनी

गाऊनी संसार आभार


आला नाचत वसंत बहार

सृजनशील नव आविष्कार


साहित्याला गुण द्या
लॉग इन