STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

3  

Meenakshi Kilawat

Others

वसंत फुलला मनोमनी.

वसंत फुलला मनोमनी.

1 min
212

मिटली प्रतिक्षा वसंत फुलला

दग्ध क्षण ही विसरूनी गेला

मनोमनी हर्षवी जनामनाला,

नवागताचा जन्म जाहला.!!

वसंताचे अती सुंदर नवरंग,

शिकवी एेक्याचा जणू महामंत्र


अहा निसर्ग बघा हा फुलला

जणू जाणत असे विद्या तंत्र.!!

सुर्याेदयाची लाली पसरे भूवर

उलगडे नभी घंटारव रंजन

मेघमनोहर नटला औदुंबर

करीती मधूरं पक्षी कुंजन!!

सप्तरंगाचे फुलतो पिसारा

फुटती मनात हे कुसुमाकर

अमृत सांडे दिव्य संजीवन

पंचम वेदात ही अमोलधन!!


सरितासागर भरे जळाने,

आम्रवृक्ष मोहर दर्प स्वानंद

सजवले किती ऋतूने धरेला

हिरव्या पानांची मोहक साद!!

वसंत सोहळा हा वातावरनी,

रतीमदनाचा विरह मिलन,

कधी मौन होई वेडापवन,

श्वासाची अलगद रूनझून !!


मनमोहक चैतन्याचे समिकरण

चित्रकारीता जणू शोभे गगन

सृष्टीला मोहतो सूर्य किरण

सुख समाधान विलसे जनमन!!

चंचल नीलांबर अद्भूत रम्य

हिमालयावर ऋतुचे आयोजन

वसंतात घटती अमुल्य बदल

या युगतारकास अभिमान।।



Rate this content
Log in