STORYMIRROR

Babu Disouza

Others

3  

Babu Disouza

Others

वसंत बहार

वसंत बहार

1 min
234

लागे चाहूल आला वसंत ऋतू आला 

सांगे कोकीळ कूजन करूनी जनाला 

रंग गंधांचा बहर उधळीत आला 

पुन्हा एकदा देतसे चैतन्य जगाला 

-१-

वनी उपवनी नवपालवी तरूंना 

कोमल कोवळी तलम पर्णे डुलती 

छाया खुणवे विसाव्यास वाटसरूंना 

वसंत प्रभावे जीवा स्वप्ने झुलविती 

-२-

उत्सव फुलांचा वसंत घेऊन आला

ऋतुराज तो सृष्टीला खुलवित आला

चोहीकडे सारा आनंदी आनंद झाला

राव्यांचा थवा नभी गिरक्या घेत आला

-३-


Rate this content
Log in