वसंत बहार
वसंत बहार
तरुवेलींना फुटली सोनेरी पालवी…
आज पुन्हा बहरली वनराई…
रानावनात पहा कशी…
मोहरली आमराई….
टिपुर सजले चांदणे..
निरागस ते चंद्राचे हसणे..
आजीच्या ऐकत गोष्टी…
अंगणात पहुडली अंथरुणे…
कोकिळेची मंजूळ साद,मयुराचा नाच…
किती लोभस ती वसंत पहाट ..
कैरीचं पन्हं, आंबट-गोड लोणचं…
किती करावं कौतुक,ऋतुराजाच्या आगमनाच…
कुरवड्या ,शेवया,पापडांची तयारी…
कडकत्या या उन्हाला वाळवनांची घाई…
सुट्टीचा हा सण जणु…
आनंद देई भारी..
होळीच्या रंगात रंगली सृष्टी..
डोंगरावरी पळसफुलांच्या धगधगत्या मशाली…
बळीराजाच्या आनंदाची घेऊन सुगी…
घरोघरी पसरली वसंत ऋतू ची लाली…
रानावनातल्याच गोष्टी सार्या…
शहरात कुठे हा असा पसारा…
गाववेशींना घेऊन कवेत..
पहा कसा वसंत बहरला….
