वर्तमानपत्र...
वर्तमानपत्र...
1 min
287
वर्तमानपत्र म्हणजे
जनतेचा वास्तव आरसा,
दिसू कसे आपण त्यात
प्रतिबिंबाचा ताे मासा
विविध रंगी वर्तमानपत्र
असतात अनेक नावाची,
लाेकमताचा आदर
हीच सेवा त्यांची
वर्तमानपत्र वाचण्याची
सवय असू द्यावी,
मन व मेंदू विस्तारणारी
देवघेव व्हावी
वर्तमानपत्र नाही नुसतं
पान बातम्यांचे,
साहित्य,कला,सेवा,संगीत
यासारख्या बहुविध क्षेत्रांचे
