वृक्षतोड
वृक्षतोड
1 min
12.2K
सुकलेल्या झाडावर एकच घरटे,
ओसाड रानात पाणी नाही मिळते,
ओसाड रान होतात का?
पशू पक्षी मरतात का?
कारण करतो माणूस निसर्गाची हानी,
पडतो सगळ्यांनाच तो मरणाच्या दारी.
वृक्षतोड करतोस काय?
मोठया इमारती बांधतोस काय?
वृक्ष नाही तर वर्षा नाही,
वर्षा नाही तर पीक नाही,
पीक नाही तर माणूस नाही,
फुल नाही की फळ नाही.
मग उपयोग कोणाला त्याला इमारतींचा,
नुसत्या दिसायला त्याला सौंदर्यतेच्या,
वृक्षतोड करू नकोस,
स्वतःच स्वतःला मारू नकोस