वृक्षारोपण
वृक्षारोपण
1 min
555
झालीया कमी
ही वनराई,
रुसली बघा
धरणीआई,
रुसवा तिचा
जरा काढू या,
मिळून सारे
झाडे लावू या।।धृ।।
झाडांची झाली
कत्तल खूप
वसुंधरेचे
हरले रूप
रोपांचा तिला
साज देऊ या।।1।।
दिसता जागा
लावू रोपटी
उद्या होतील
ती मोठमोठी
सावलीत त्या
खेळ खेळू या।।2।।
पाहून हरी
झाडांची दाटी
वरुणराजा
करेल बत्ती
येईल वर्षा
त्यात भिजू या।।3।।
झटपट या
या सारेजण
मजेने करू
वृक्षारोपण
कौतुके त्यास
पाणी घालू या।।4।।
