वृक्षारोपण वसा
वृक्षारोपण वसा
वृक्षवल्लरीचे जीवनी महत्त्व मानवा,
जाणता तू राहिलासी अजाण रे कसा ?
अविरत वृक्षतोड करी निर्दयी दानवा ,
विसरला रे अनंत त्यांचे उपकार असा ?
बकाल,उदास केलीस रे तूच ही सृष्टी ,
बांधून बंगले,शहरे बागायत रानावरी.
सत्ता पैसा येता अंध झाली रे तव दृष्टी,
ओढवून घेतला तू विनाश,ये भानावरी .
प्रदुषण वाढता निसर्ग चक्र बदलले.
ऋतूचक्र बदलता पाऊस लहरी झाला .
जपत राहता स्व स्वार्था तुझे चोचले ,
विसरलास रे पर्यावरण संतुलनाला.
वृक्षच देती सर्वां छाया नि फळे रसदार .
मूळ,खोड,पाने फळे साली औषधी फार .
महती तयाची वदती ऋषि,मुनी,वारंवार ,
ग्रंथ,पुराणे,वेद, शास्त्र ही धन्वंतरी आधार .
घेता वृक्षारोपण वसा,देऊ पर्यावरणा भार,
लावू तुळस, लिंब, बेल नि पिंपळ डेरेदार.
संकल्प आता,पळवून लावूया सारे आजार,
ठेवून स्वच्छ अंगण परिसर ,आनंदी घरदार .
