वृक्ष
वृक्ष
1 min
158
वृक्ष एक जागी उभा
मुळे खोल खोल जाती
तिथे शोधता ओलावा
वृक्ष जातो गगनासी
झाड येता बहरून
रंग पानांना हिरवा
उभे रहावे म्हणून
वेल येते आधारासी
गुज करण्या बैसले
पक्षी किती फांदीवर
होता उन्हाने व्याकुळ
कुणी बैसला छायेसी
असेच हे जीवन
मज भासे वृक्षापरी
मनमूळ खोल जाई
ओली माया शोधण्यासी
हवे बहराया प्रेम
रंग प्रीतीचा हिरवा
भाव वेडे होता मन
साद घालते कोणासी
